Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात (Accident)झाला आहे. बसला (Bus)कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर (express) वाहतुकीची कोंडी झाली आहे. हा भीषण अपघात खोपोली (Khopoli) जवळ झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत, त्यातील 4 जण गंभीर आहेत. जखमींना नगरपालिका रुग्णालयात (municipal hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (A terrible accident marriage bus on the Mumbai-Pune Expressway; one died)
अधिक वाचा : Love Marriage नंतर पतीनं कटर मशीननं पत्नीचे केले अनेक तुकडे
मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपपातस्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदतीसाठी आयआरबी, देवदूत , महामार्ग पोलिस , अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.
अधिक वाचा : भाजपच्या मनातील गोष्ट आली बावनकुळेंच्या ओठावर
अपघातातील 4 गंभीर जखमीना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर 6 जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटना स्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असल्याने तीनही लेन वरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.