Aadtitya Thackeray : मुंबई : शिंदे गटातील आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवून दाखवाव्यात असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच आम्ही खालच्या स्तराचे कधीच राजकारण केले नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (aaditya thackeray challenge eknath shinde over election and shivsena)
एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जर मी उपमुख्यमंत्री असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि नव्याने निवडणूका लढवल्या असत्या. आमचा पक्ष संविधानावर चालतो. तसेच आमचा कायद्यावर विश्वास आहे. शिवसेनेतील आमदार फुटतात आणि त्यांचे बंड कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरले तर देशात अशांतता निर्माण होईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अधिक वाचा : Amruta Fadanvis : भिडे गुरूजी हिंदुत्वाचा स्तंभ त्यांनी महिलांचा आदर करावा - अमृता फडणवीस
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही, यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या २५ वर्षांत तोट्यात चालणारी महानगरपालिका ८० हजार कोटी रुपयांत नफा कमवाणारी महानगरपालिका बनवली. या सगळ्यांचा हिशोब आमच्याकडे आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी आणि माझे बाबा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला म्हणून हे बंड झाले असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्हाला आमचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण परत मिळेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : BHANDARA । रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...
आदित्य ठाकरे म्हणाले की माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा भूमीपूत्र आणि हिंदुत्वाचा मुद्धा उचलला होता, कारण तो मुद्दा महत्त्वाचा होता. आता माझे वडिल उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष दिले असे आदित्य ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे गटाने आपल्याला देशद्रोही बोलण्याशिवाय काहीही केले नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. एक दोन व्यक्तींना लाच देता येते परंतु एकाच वेळी ५० जणांना लाच देणे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे परंतु ते आमच्यावरच टीका करत आहेत असेही शिंदे म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.