'हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे', झळकले बॅनर 

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 25, 2019 | 16:30 IST

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यातच आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Poster calling Aaditya Thackeray as future Chief Minister come up in Worli
'हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे', झळकले बॅनर   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले.
  • आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • ज्या दिवशी आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली गेली तेव्हापासूनच शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी सुरू केली. 

गुरूवारी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. पण आता खरी लढत सुरू झाली आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी. आता मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. त्यातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यातच आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या दिवशी आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली गेली तेव्हापासूनच शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी सुरू केली. 

गुरूवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले. या बॅनरवर आदित्य यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. 

 Poster calling Aaditya Thackeray as future Chief Minister come up in Worli, the constituency from where he has been elected to the state Assembly

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन आपआपली मतं व्यक्त केली. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजपची अडचण समजून घेणार नाही तर दुसरीकडे महायुतीतचंच सरकार होईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. 

ठाकरे घराण्यातील पहिलेच व्यक्ती म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली. निवडणूक लढवून त्यांना यश देखील मिळालं. वरळी हे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याच मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश माने निवडणूक लढवत होते. ही निवडणूक आदित्यचं जिंकणार यावर ठाम विश्वास होतं. आदित्य निवडणूक लढवणार म्हणून मनसेनं वरळी आपला उमेदवार दिला नाही. यासोबतच या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात अपेक्षित निकाल लागला. आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.

दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रीपद घेणार असं म्हणत भुजबळांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली. भुजबळांच्या या वक्तव्यावरून असं स्पष्ट होतं आहे की, मुख्यमंत्रीपद हवं असल्यास आमच्यासोबत या असंच भुजबळांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी