Aaditya Thackeray: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग, स्वत: ट्विट करुन दिली माहिती

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 20, 2021 | 18:45 IST

Aaditya Thackeray: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग
  • माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करुन घ्यावी - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. (Aaditya Thackeray environment minister of Maharashtra tests positive for covid 19) 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत लिहिलं, "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करुन घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या."

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. यावेळी बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तब्बल २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्यातील स्थानिक प्रशासनाकडून अनेक ठिकाणी निर्बंंधही लागू करण्यात आले आहेत. तर काल (१९ मार्च २०२१) राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी