Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री Eknath Shinde यांना ओपन चॅलेंज, "थेट सांगू इच्छितो की..."

Aaditya Thackeray challenge to CM Eknath Shinde: आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज देत मुंबईतील रस्ते घोटाळ्याविषयी चर्चेचं आव्हान दिलं आहे.

Aaditya Thackeray open challenge to cm eknath shinde on mumbai bmc road scam read in marathi
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री Eknath Shinde यांना ओपन चॅलेंज, "थेट सांगू इच्छितो की..." 
थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज
  • मुंबईतील रस्ते घोटाळ्याविषयी चर्चा करण्याचं दिलं आव्हान

Aaditya Thackeray on BMC Road Scam: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. (Aaditya Thackeray open challenge to cm eknath shinde on mumbai bmc road scam read in marathi)

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बीएमसी रस्ते घोटाळ्याविषयी समोरासमोर बोलण्याचं आव्हान असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

तीन प्रश्नांचे स्पष्टीकरण द्या

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, मुंबई महानगरपालिकेने मी विचारलेल्या 10 प्रश्नांवर प्रतिसाद दिला. पण त्यामध्ये अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 1) व्यावहारिक आणि संभाव्य स्केल, 2) मोठा घोटाळा 3) टोळधाड 'सेटिंग'. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना मी आज थेट सांगू इच्छितो की, त्यांनी मला चर्चेसाठी बोलावून मी विचारलेल्या 3 प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे.

हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे

मला त्यांच्याकडून हे मुद्दे समजून घ्यायला आवडतील :

1) कंत्राटदारांनी नवीन अंदाजित किमतीनुसार बोली न लावता सुधारित SOR पेक्षा सरासरी 8% जास्त बोली का आणि कशी लावली ?

2) आजपर्यंत GST हा स्वतंत्रपणे कधीच मोजला गेला नाही, असे असतानादेखील कंत्राटदारांना 66% वाढीव देयके देऊन GST वेगळा का लावण्यात आला ?

हे पण वाचा : महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत, अन्यथा...

3)  फक्त 5 बोलीदारांनीच अर्ज कसा केला आणि त्या सर्वांना प्रत्येकी एक एक निविदा कश्या मिळाल्या ? आधीच ठरविल्याप्रमाणे बोलीदारांनी बोली लावली, ही एक प्रकारची टोळधाड (कार्टेलायझेशन) नाही का?

4)  मुंबई महानगरपालिकेने नमूद केल्याप्रमाणे कोणत्या नगरसेवकांनी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे सुचविले? ऑगस्ट महिन्यात आणि आता निविदा काढल्या गेल्या तेव्हा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते कार्यरत नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका नेमका कोणत्या नगरसेवकांचा उल्लेख करत आहे? तसेच निवडलेल्या 400 किमी रस्त्यांसंदर्भातील नगरसेवकांची विनंती पत्रे आम्ही पाहू शकतो का?

हे पण वाचा : तोंड झाकून का झोपू नये? वाचा कारण...

5) राष्ट्रीय अनुभव असलेल्या या कंत्राटदारांनी मुंबईसारख्या इतर शहरात कुठे आणि कोणत्या दराने काम केले आहे? मुंबईसारख्या इतर कोणत्या शहरात सगळे कॉंक्रिटचे रस्ते आहेत?

6) मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे 24 महिन्यांचा (पावसाळा वगळता) कालावधी 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी लागणारा आहे. प्रत्यक्षात हे काम 32 महिन्यांपर्यंत चालते. काँक्रिट क्यूरिंग टाईम आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी लागणाऱ्या कालावधीचा हिशोब या प्रिसादामध्ये धरला गेला आहे का?

ही रस्त्यांची मेगा कॉन्ट्रॅक्ट्स खोके सरकारच्या फायद्यासाठी तयार केली गेलीत का? ते प्रसारमाध्यमांसमोर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून समजून घ्यायला मला आवडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी