आदित्य ठाकरे यांना 'हे' खातं, 'सामना'तून केलं जाहीर

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 09:36 IST

पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेलेल्या आदित्य ठाकरे यांना अत्यंत महत्त्वाची खाती मिळणार असल्याचं समजतं आहे. त्याविषयी सामनातून देखील माहिती देण्यात आली आहे. 

aaditya thackeray will get tourism and environment department saamana announced possible list
आदित्य ठाकरे यांना 'हे' खातं, 'सामना'तून केलं जाहीर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आदित्य ठाकरे यांना पर्यटन आणि पर्यावरण खातं मिळणार
  • शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या 'सामना'ने जाहीर केली संभाव्य खातेवाटपाची यादी
  • शिवसेनेकडे अनेक महत्त्वाची खाती, राष्ट्रवादीकडे गृह तर काँग्रेसकडे महसूल

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचं खातं मिळणार आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून हे जाहीर करण्यात आलं. काल (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. ज्यावर त्यांनी आज( रविवार) सकाळी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली. मात्र, त्याआधी सामनामधून संभाव्य मंत्रिमंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना अत्यंत महत्त्वाचं असं पर्यावरण आणि पर्यटन हे खातं मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, सूत्रांकडून अशीही माहिती मिळते आहे की, आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन या महत्त्वाच्या खात्यांसह राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) हे महत्त्वाचं खातं देखील त्यांना मिळणार असल्याचं समजतं आहे. 

सामनाने जाहीर केलेली संभाव्य खातेवाटप 

एकनाथ शिंदे – नगरविकास
सुभाष देसाई – उद्योग
आदित्य ठाकरे – पर्यावरण, पर्यटन
अनिल परब – परिवहन
संजय राठोड -वन
उदय सामंत -उच्च व तंत्रशिक्षण
दादा भुसे – कृषी
संदीपान भुमरे – रोजगार हमी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
शंकरराव गडाख – जलसंधारण
अजित पवार – अर्थ
अनिल देशमुख – गृह
जयंत पाटील – जलसंपदा
छगन भुजबळ – अन्न व नागरीपुरवठा
नवाब मलिक – अल्पसंख्याक
बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

थोड्याच वेळापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी केली असून त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता काही वेळातच ही यादी जाहीर केली जाऊ शकते. मात्र, अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच आपल्याला समजू शकतं की, कोणत्या  मंत्र्याला नेमकं कोणतं खातं मिळणार. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे महत्त्वाच्या तीन खात्यांसाठी बरीच चढाओढ सुरु होती. त्यामुळेच खातेवाटपाला बराच उशीर झाला. अखेर काल संपूर्ण खात्यांविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी