राज्यातील सत्ता आमच्याकडे आल्यानं केंद्रातील सत्तेचा गैरवापर - शरद पवार

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 11, 2022 | 10:20 IST

राज्यातील सत्ता आपल्या हाती आली आहे, पण दिवस सोपे राहिलेले नाहीत. सत्तेपासून वंचित असलेले अनेक लोक अस्वस्थ आहेत.  देशातील सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आघाडीतील नेत्यांवर आरोप केले जात असल्याचं टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहेत.

Sharad Pawar
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला त्रास देण्याचा प्रयत्न - पवार   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे काम कोण करीत आहे, हे महाराष्ट्र ओळखून आहे, - जयंत पाटील
  • आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केंद्रातील सत्तेनं केलं.
  • राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू - शरद पवार

अमरावती : राज्यातील सत्ता आपल्या हाती आली आहे, पण दिवस सोपे राहिलेले नाहीत. सत्तेपासून वंचित असलेले अनेक लोक अस्वस्थ आहेत.  देशातील सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आघाडीतील नेत्यांवर आरोप केले जात असल्याचं टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहेत. ते अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या "संवाद बैठक" मेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी त्यांनी द काश्मीर फाईल्सवरुन भाजपवर टीका केली आहे.  

संवाद बैठकीत बोलताना, शरद पवार म्हणाले की, आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे कामही या लोकांनी केले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे; पण आपण सामूहिक शक्ती उभी केली तर त्यांचे प्रयत्न निश्चितपणे हाणून पाडता येतील.  

मग हिंदू समुदाय असुरक्षित कसा 

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन भाजपवर टीका केली आहे. काश्मीरमधील नरसंहार झाला तेव्हा भाजपच्या पाठिंब्यानं बनलेलं व्ही. पी. सिंग याचे सरकार होते. काश्मीरमधील हिंदुना मुस्लिमांनी हुसकावून लावलं, असं आता दाखवलं जातं.  एका व्यक्तीनं काश्मीर फाईल्स हा चित्रपट बनवला त्यात सांगितलं की, बहुसंख्याक नेहमी अल्पसंख्याकावर हल्ला करत असतात, पण जेव्हा जे बहुसंख्याक मुस्लीम असतात तेव्हा हिंदू समुदाय असुरक्षित कसा होतात, असा सवाल शरद पवार यांनी केला. केंद्र सरकार देशात जातीय द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. सध्या देशात वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. वेगळ्या प्रकारची धार्मिक फूट पाडली जात आहे. जिथे हिंदू-मुस्लिम विभागले जाऊ शकतात किंवा दलित-हिंदू वेगळे केले जाऊ शकतात, अशी भीती शरद पवार यांनी वर्तवली आहे. 

देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ, महागाई हे प्रश्न गंभीर होत असताना, त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.  द काश्मीर फाईल्स या चित्रपटात भाजपनं काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर इतर विरोधी पक्षांवर हल्लाबोल सुरू केला होता. काश्मिरमधील नरसंहाराची माहिती अनेकांना व्हावी किंवा पंडितांना कसं तेथून हुसकावण्यात आलं हे सर्वांना कळावं यासाठी राज्यात या हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा यासाठी राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं जोरदार मागणी केली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 

आंदोलनाचे नेतृत्व चुकीच्या हाती 

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सातत्याने केले आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व चुकीच्या हाती गेले. काही लोक कामगारांना भडकविण्याचे काम करीत आहेत. मुंबईत घडलेल्या घटनेला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधकांना लक्ष्य केले.  येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे या वेळी उपस्थित होते.दरम्यान, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे काम कोण करीत आहे, हे महाराष्ट्र ओळखून आहे, असे जयंत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांनीही भाजपवर  टीका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी