CM Uddhav Thackeray on Restrictions : तर आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा, लसीकरणाचा वेग वाढवण्याचे दिले निर्देश

CM Uddhav Thackeray on Restrictions राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवा आणि सुविधा तयार ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच सध्या राज्याला दिवसाला ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागल्यास निर्बंध कडक करावे लागतील असा इशाराही त्यांना दिला.

थोडं पण कामाचं
  • राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे.
  • लसीकरणाचा वेग वाढवा आणि सुविधा तयार ठेवा
  • निर्बंध कडक करावे लागतील

CM Uddhav Thackeray on Restrictions : मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवा आणि सुविधा तयार ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच सध्या राज्याला दिवसाला ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागल्यास निर्बंध कडक करावे लागतील असा इशाराही त्यांना दिला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. जगभरात कोरोना वाढत असून आता बेसावध राहू नका असे आवाहनी त्यांनी यावेळी केले. 

गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली.  राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे ४०० मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज  ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. यूके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली

ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून  घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच  आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून व  स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेलद्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी