CCTV Video : वरळीत सी लिंकवर अपघात, टॅक्सीने दोघांना उडवले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2022 | 12:18 IST

accident at bandra worli sea link mumbai, taxi thrashed two : मुंबईत वांद्रे - वरळी सागरी सेतूवर (बँड्रा - वरळी सी लिंक) अपघात झाला. एका टॅक्सीने सी लिंकवर वाहनांच्या मार्गात उभ्या असलेल्या दोघांना उडवले.

accident at bandra worli sea link mumbai, taxi thrashed two
CCTV Video : वरळीत सी लिंकवर अपघात, टॅक्सीने दोघांना उडवले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • CCTV Video : वरळीत सी लिंकवर अपघात, टॅक्सीने दोघांना उडवले
  • एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
  • जखमी व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

accident at bandra worli sea link mumbai, taxi thrashed two : मुंबई : मुंबईत वांद्रे - वरळी सागरी सेतूवर (बँड्रा - वरळी सी लिंक) अपघात झाला. एका टॅक्सीने सी लिंकवर वाहनांच्या मार्गात उभ्या असलेल्या दोघांना उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि एकजण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

सागरी सेतूवरून वेगाने कार जात-येत असतात. एक कार वेगाने सी लिंकवरून जात होती. अचानक एक घार कारसमोर आली. कारची धडक लागून घार जखमी झाली. कारमध्ये अमर जरिवाला आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर श्याम सुंदर कामत असे दोघेजण होते. 

नेपीयन सी रोड येथील एका सोसायटीतले रहिवासी असलेले अमर जरिवाला यांना पशूपक्ष्यांविषयी विशेष भूतदया आहे. याच भूतदयेपोटी जरिवाला यांनी त्यांच्या ड्रायव्हरला कार थांबविण्यास सांगितली. यानंतर जरिवाला आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही कारमधून बाहेर आले आणि घारीला काय झाले हे बघू लागले. ते घारीकडे बघत असताना शेजारच्या मार्गिकेतून (लेनमधून) वेगाने आलेल्या टॅक्सीने अमर जरिवाला आणि श्याम सुंदर कामत या दोघांना उडवले. अपघातात जरिवाला यांचा मृत्यू झाला तर त्यांचा ड्रायव्हर श्याम सुंदर कामत गंभीर जखमी झाला. अपघातचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 

फूटेज बघताना त्रास होऊ शकतो यामुळे हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास यापैकी कोणताही त्रास असलेल्या तसेच हळव्या असलेल्या व्यक्तींनी व्हिडीओ बघणे टाळावे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी