Accident between Nahur and Bhandup stations delay trains on Central Railway fast line : मुंबईत ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडुप आणि नाहूर दरम्यान मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
डाऊन फास्ट लाइनवर नाहूर आणि भांडुप दरम्यान रेल्वेमार्ग ओलांडत असलेली महिला वेगाने जाणाऱ्या ट्रेनखाली सापडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी गेले. महिलेचा मृतदेह रुळांवरून हटवून ताब्यात घेण्यात आला. नियमानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे. पण महिलेचा मृतदेह रुळांवरून हटवून ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत जो वेळ खर्ची पडला त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे वाहतूक कोलमडली. परिस्थिती हळू हळू सुरळीत होत आहे. लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल, असे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.