Mumbai Railway : मुंबईत रेल्वेचा मोठा अपघात टळला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 03, 2022 | 11:29 IST

Accident Of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT Khopoli Fast Local Was Avoided Due To The Vigilance Of Motorman Ashok Sharma : मुंबईत मशीद बंदर येथे रेल्वेचा मोठा अपघात टळला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - खोपोली जलद लोकल (फास्ट लोकल) मशीद बंदर स्थानकाजवळ (रेल्वे स्टेशन) असताना अपघात टळला.

Accident Of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT Khopoli Fast Local Was Avoided Due To The Vigilance Of Motorman Ashok Sharma
मुंबईत रेल्वेचा मोठा अपघात टळला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत रेल्वेचा मोठा अपघात टळला
  • सीएसएमटी - खोपोली जलद लोकल (फास्ट लोकल) मशीद बंदर स्थानकाजवळ (रेल्वे स्टेशन) असताना अपघात टळला
  • रेल्वे मार्गावर धातुचे पिंप पडले

Accident Of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT Khopoli Fast Local Was Avoided Due To The Vigilance Of Motorman Ashok Sharma : मुंबईत मशीद बंदर येथे रेल्वेचा मोठा अपघात टळला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - खोपोली जलद लोकल (फास्ट लोकल) मशीद बंदर स्थानकाजवळ (रेल्वे स्टेशन) असताना अपघात टळला.

EX बायको शमीचा पिच्छा काही सोडेना; हार्दिकचा फोटो शेअर करत म्हणाली, देशाची प्रतिष्ठा बायकांचा नाद करणाऱ्यांमुळे वाढत नाही

रेल्वे मार्गावर दगडाने भरलेले धातुचे पिंप पडले असल्याचे पाहून मोटरमनने तातडीने ब्रेक दाबला. ब्रेक वेळेत दाबल्यामुळे लोकल थांबली आणि अपघात टळला. यानंतर रेल्वे मार्गावरून पिंप हटवून दुसरीकडे ठेवण्यात आले. याप्रकरणी भायखळा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मशीद बंदर आणि वाडी बंदर दरम्यान रेल्वे मार्गावर धातुचे पिंप आढळले. हे पिंप कोणी ठेवले याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मशीद बंदर आणि वाडी बंदर दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. 

जलद लोकलच्या मार्गात पिंप पाहून मोटरमन अशोक शर्मा यांनी ब्रेक लावला. पण गाडी वेगात होती त्यामुळे पिंपाला लोकलची थोडी धडक बसली आणि मोठा आवाज झाला. आवाज ऐकून प्रवासी घाबरले. पण मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठे संकट टळले. लोकल थांबवल्यानंतर मोटरमन अशोक शर्मा यांनी प्रवाश्यांच्या मदतीने रेल्वे मार्गावरून पिंप हटवून शेजारी ठेवून दिले. अपघात टळला तरी याचा परिणाम पुढील काही तास लोकलवर दिसत होता. लोकल विलंबाने धावत होत्या. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भायखळा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडाने भरलेले पिंप रुळांवर कोणी ठेवले, याप्रकरणी मशीद बंदर आणि वाडी बंदर येथील सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी