Mumbai Goa Highway वर अपघात, मुंबईच्या कुटुंबातील 2 चिमुरड्यांसह तिघांचा मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 07, 2023 | 18:24 IST

Accident on Mumbai Goa Highway, 3 of same family including 2 children died : मुंबई गोवा हायवेवर माणगावमध्ये ट्रक आणि कार यांचा अपघात झाला. यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत.

Mumbai Goa Highway
अपघातात मुंबईच्या कुटुंबातील 2 चिमुरड्यांसह तिघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Mumbai Goa Highway वर अपघात
  • मुंबईच्या कुटुंबातील 2 चिमुरड्यांसह तिघांचा मृत्यू
  • जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू

Accident on Mumbai Goa Highway, 3 of same family including 2 children died : मुंबई गोवा हायवेवर माणगावमध्ये ट्रक आणि कार यांचा अपघात झाला. यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

रिवान दर्शन तावडे (3 वर्षे) आणि रित्या दर्शन तावडे (6 महिने) आणि दोन्ही मुलांची आजी वैशाली विजय तावडे (72 वर्षे) यांचा अपघातात मृत्यू झाला. सर्व जण मुंबईतील बोरिवलीचे रहिवासी होते. बोरिवलीचे तावडे कुटुंब कारमधून देवगडला कोकणात जात होते. प्रवासादरम्यान माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत अपघात झाला. अपघातात दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माणगाव पोलीस अपघात प्रकरणी तपास करत आहेत. 

प्राथमिक वृत्तानुसार कार आणि मालवाहक वाहन यांची धडक झाली. या अपघातात कारचे नुकसान झाले. कारमध्ये बसलेल्यांपैकी दोन जण जखमी झाले तर तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. 

Shani : पुढील पाच वर्ष शनिचा या राशीवर सर्वाधिक प्रभाव पडणार

फळं खाण्याची योग्य वेळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी