मनसेच्या मते, उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलचं झालं; सत्ता जाण्यावरून MNS नं स्पष्ट केली भूमिका

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 30, 2022 | 14:25 IST

काल (गुरुवारी) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात आता भाजपचं (BJP Govt) सरकार येणार हे निश्चित झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही आमदारांच्या गटानं केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार पडलं.

what happened to Uddhav Thackeray was good-MNS
मनसेच्या मते, उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलचं झालं; सत्ता जाण्यावरून MNS नं स्पष्ट केली भूमिका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आणि मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं.
  • उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलेच झाले असं मत मनसेनं मांडलं आहे.
  • मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे

Maharashtra Government Formation :  काल (गुरुवारी) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात आता भाजपचं (BJP Govt) सरकार येणार हे निश्चित झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही आमदारांच्या गटानं केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आणि मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं.

उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामुळे राज्यातील अनेकांकडून सहानुभूती मिळत आहे. सामन्य नागरिक व्हॉट्सअप अन् फेसबुक स्टोरी ठेवत पाठिंबा दाखतवत आहेत. परंतु राजकरणाच्या आखाड्यात मात्र त्यांना सहानुभूती मिळत नाहीये. मुख्यमंत्री पद आणि विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरेंबरोबर जे झालं ते चांगलेच झाले असं मत मनसेनं मांडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणाऱ्या आणि प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला अजिबातच सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. 

मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, "राज साहेबांच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणार्‍या, प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणारे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही." 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि आता नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं  उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी