कोव्हिडच्या वाढत्या संकटादरम्यान महाराष्ट्रात तीन ठिकाणी खारफुटी नष्ट होते आहे, पर्यावरण कार्यकर्त्यांचा इशारा

मुंबई
Updated May 15, 2021 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये खारफुटीच्या तीन जंगलांना धोका आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात खारफुटी नष्ट करण्याचा उद्योग सुुरू आहे.

Mangroves
कोव्हिडच्या वाढत्या संकटादरम्यान महाराष्ट्रात तीन ठिकाणी खारफुटी नष्ट होते आहे, पर्यावरण कार्यकर्त्यांचा इशारा  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • उरण भागातील खारफुटीला धोका असल्याचा पर्यावरणवाद्यांचा इशारा
  • बांधकामांमुळे खारफुटीवर वाईट परिणाम होत असल्याचा दावा
  • रायगडमधल्या उरण तालुक्यात तीन ठिकाणी खारफुटी धोक्यात

मुंबई: महाराष्ट्राचा (Maharashtra) कोरोनाविरोधातला (corona) लढा (war) अव्याहत सुरू असताना राज्यातल्या काही पर्यावरण कार्यकर्त्यांनी (environment activists) मात्र एक महत्त्वाचा (important) आणि धोक्याचा इशारा (alert) दिला आहे. या कार्यकर्त्यांनी असा दावा केला आहे की रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या उरण (Uran) इथे तीन ठिकाणी असलेल्या खारफुटीच्या जंगलावर (mangroves) लॉकडाऊनच्या (lockdown) काळात कुऱ्हाड (cut) चालवण्यात येत आहे.

पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

या खारफुटीच्या संदर्भात पर्यावरण कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे आणि खारफुटीला असलेल्या धोक्याबद्दल त्यांना इशारा दिला आहे. या भागात प्रस्तावित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे या खारफुटीला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले आहे, 'ज्या वेगाने या खारफुटीचे मोठे मोठे भाग गाडले जात आहेत ते धक्कादायक आहे.'

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे की अशा प्रकारचे कुठलेही काम हे मुंबई न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आहे ज्यान्वये खारफुटी असलेल्या भागात कोणतेही बांधकाम करण्यावर बंदी आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे प्रमुख बी. एन. कुमार म्हणतात, "ज्या वेगाने या खारफुटीचे मोठे मोठे भाग गाडले जात आहेत, खासकरून सिडकोच्या होल्डिंग पाँड 2च्या द्रोणागिरी टेकाडाच्या भागात, ते धक्कादायक आहे. हा भाग महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट प्राधिकरणाने सीआरझेड-1मध्ये ठेवला आहे."

खारफुटीच्या विनाशामुळे अकाली पुरांच्या संख्येत वाढ

हाती आलेल्या माहितीनुसार या भागातल्या काही खाली असलेल्या भागांमध्ये असमुद्री मातीचा भराव घालून त्या एकाच पातळीवर आणल्या गेल्या आहेत तर इतर काही ठिकाणीही बांधकामाला सुरुवात झाली आहे. यामुळे उरणमध्ये अकाली पुराचे प्रमाण वाढले आहे. पाँड 2 हा 237 हेक्टरच्या परिसरात पसरलेला भाग आहे. हा भाग पूरनियंत्रण प्रणालीसारखा काम करतो. मात्र इथे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या हिरव्यागार खारफुटीमुळे या पाँडचा भागही आकुंचित झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी