Shiv Sena leader Aaditya Thackeray threat : मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना धमकी मिळाली आहे.
आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स अॅप (Whats Aap) मेसेज करुन ही धमकी दिली आहे. दरम्यान, धमकी देणाऱ्याला मुंबई क्राईम ब्रॅन्चने बंगळुरूतून ताब्यात घेतले आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे.
34 वर्षीय व्यक्तीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती.
आरोपीने व्हॉट्सअॅप संदेशात अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता आदित्य यांना व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने एकूण ३ दूरध्वनी केले. त्यांनी ते घेतले नाहीत. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याचा मेसेज आल्यानंतर रितसर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्याला अटक केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.