Ketaki Chitale : हिंदी ही राष्ट्रभाषा, महाराजांचा एकेरी उल्लेख, केतकी चितळेचा वादग्रस्त प्रवास

ketaki chitale शरद पवार यांच्यावर नरकात जायची वेळ आली आहे अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे या अभिनेत्रीने शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे राज्यात वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. परंतु अशा प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट लिहून किंवा फेसबुक लाईव्ह करून वाद ओढवून घेण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही.

ketaki chitale fb post
केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्यावर नरकात जायची वेळ आली आहे अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे या अभिनेत्रीने शेअर केली आहे.
  • सोशल मीडियावर पोस्ट लिहून किंवा फेसबुक लाईव्ह करून वाद ओढवून घेण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही.
  • यापूर्वी केतकीने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, उगाच मराठीचे झेंडे नाचवू नका असे विधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते.

Ketaki Chitale : मुंबई : शरद पवार यांच्यावर नरकात जायची वेळ आली आहे अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे या अभिनेत्रीने शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे राज्यात वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुण्यातही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच केतकीविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणीही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. परंतु अशा प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट लिहून किंवा फेसबुक लाईव्ह करून वाद ओढवून घेण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी केतकीने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, उगाच मराठीचे झेंडे नाचवू नका असे विधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबईत येतात असेही केतकी म्हणाली होती. जाणून घेऊया केतकीचा वादग्रस्त प्रवास.

नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात

१ मार्च २०२० रोजी केतकीने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये केतकीने नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात असा आरोप केला होता. तसेच आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो असे म्हणून सर्व भारतीय एक आहेत युनिफॉर्म सिवील लॉ असा हॅशटॅग दिला होता. 

 

आपल्या देशात, √ तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातलीत तर ते धर्म स्वातंत्र आहे. √ किरपान...

Posted by Ketaki Chitale on Sunday, March 1, 2020


महाराजांचा एकेरी उल्लेख

केतकीने ११ जुलै २०२० रोजी एक फेसबुक पोस्ट लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा! तसेच आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका. असेही केतकीने म्हटले होते, त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर केतकीला ट्रोल करण्यात आले होते. तसेच तिला फोन करून अनेक जणांनी सुनावलेही होते. 

उगाच मराठीचा झेंडा लावू नका

केतकीने एक फेसबुक लाईव्ह केले होते. या लाईव्हमध्ये तिने आधी सांगितले की मी हिंदी आणि इंग्रजीत बोलणार आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे तर उगाच मराठीचे झेंडे लावू नका असे केतकीने म्हटले होते. तेव्हा अनेकांनी केतकीला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तसेच महाराष्ट्र ही राजभाषा आहे असे सांगितले. इतकेच नाही तर अतिशय वाईट शब्दांत केतकीला ट्रोल करण्यात आले होते. तिच्या हिंदीवरील भूमिकेमुळे वाद निर्माण झाला होता. केतकीचा फोन नंबर व्हायर झाला आणि अनेकांनी तिला अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्याचे कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी