Aditya Thackeray : अभ्यासाचा कंटाळा येत असल्यानं अंतराळवीर होण्याऐवजी नेते बनले आदित्य ठाकरे

मुंबई
भरत जाधव
Updated May 12, 2022 | 08:33 IST

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राजकीयदृष्ट्या (Politically) अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत आपल्या खात्याचे काम बरे आणि आपण बरे, अशी आदित्य ठाकरे यांची भूमिका होती. परंतु, अलीकडच्या काळात आदित्य ठाकरे हे राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत.

Aditya Thackeray explained the reason for entering politics
आदित्य ठाकरेंनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • तिसरी-चौथीत असताना आदित्य ठाकरेंना अंतराळवीर व्हायचं होतं.
  • गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागत असल्यानं राजकारणात येण्याचा निर्णय घेतलं.
  • शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राजकीयदृष्ट्या (Politically) अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत आपल्या खात्याचे काम बरे आणि आपण बरे, अशी आदित्य ठाकरे यांची भूमिका होती. परंतु, अलीकडच्या काळात आदित्य ठाकरे हे राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंना राजकारणात इतका रस कसा आला या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हवं आहे. दरम्यान मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

मी शाळेत असताना मला अंतराळवीर होऊन चंद्रावर जायचे होते. पण गणित (Mathematics) आणि भौतिकशास्त्रात (Physics) फारशी गती नसल्याने ते स्वप्न अपूर्ण राहिले, अशी आठवण शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितली. ते बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. 
मी तिसरी-चौथीत असताना मला अंतराळवीर व्हावं, असं वाटत होतं. नासा (NASA) किंवा इस्रोच्या माध्यमातून मला चंद्रावर जायचे होते. पण अंतराळवीर होण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्राच अभ्यास करावा लागतो, हे पुढे जाऊन मला कळाले. तेव्हापासून अंतराळवीर होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला गळती लागली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपण राजकारणात का आणि कसे आलो, याचे कारणही स्पष्ट केले. अंतराळवीर होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर नंतर मग मी ठरवलं की राजकारणात जाऊ. राजकारणात जाण्यासाठी काहीच लागत नाही. त्यामुळे मी राजकारणात आलो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यापासून ते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आदित्य ठाकरे यांची प्रमुख भूमिका असेल. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून 'फिल्डवर' उतरून कामाला लागले आहेत. तसेच ते भाजप आणि मनसेच्या नेत्यांवर उघडउघडपणे टीका करताना दिसत आहेत.

राजकारणासाठी अयोध्येला जात नाही: आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वाचे विषय आहेत. देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर कुठलाही राजकीय पक्ष बोलत नाही. अयोध्येचा संघर्ष सुरु असताना शिवसेना तेथे गेली होती. अयोध्या हे आमचं श्रद्धास्थान आहे. मी त्याठिकाणी राजकारणासाठी नव्हे तर श्रद्धेच्या भावनेने जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी