Aditya Thackeray changes Twitter bio in 2020 : मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ट्विटर बायोमधील स्वतःचे मंत्रीपदाचे उल्लेख काढून टाकल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे वृत्त चुकीचे आहे, असेच म्हणावे लागले. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायो मधून स्वतःच्या मंत्रीपदाचे उल्लेख काढला आहे. पण हा बदल आदित्य यांनी २०२० मध्येच केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आणि आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोचा संबंध नाही.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आणि दिशा सालियान (दिशा सालिअन) या दोघांच्या मृत्यूचा आणि आदित्य ठाकरे यांचा काही तरी संबंध असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देतो आणि आरोपमुक्त झाल्यानंतरच मंत्रीपद स्वीकारेन अशी भूमिका घेतल्याची बातमी निवडक माध्यमांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या ट्विटर बायोमधून त्यांच्या मंत्रीपदाचे उल्लेख काढून टाकला. बायो बदलण्यात आल्याचीही बातमी संबंधित माध्यमांनी दिली. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमध्ये बदल केल्याच्या वृत्तात तथ्य नाही.
सोशल मीडियात २०२० मध्ये आदित्य ठाकरे विरोधी ओरड सुरू झाली. यानंतर आदित्य यांनी ट्विटरमधील बायोतून स्वतःच्या मंत्रीपदाचे उल्लेख काढून टाकले. पण ते मंत्रीपदावर कायम आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदित्य यांनी दिलेला राजीनामा फेटाळला अशा स्वरुपाची बातमी निवडक माध्यमांनी दिली. यानंतर आदित्य यांच्या राजीनाम्याचा विषय माध्यमांतून मागे पडला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.