Corona Update : कोरोनाबाबत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता, जर 'हे' झालं तर येईल कोरोनाची चौथी लाट, पण घाबरुन नका

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 05, 2022 | 16:24 IST

काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona ) रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात पटीने वाढली आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांविषयी अनेक राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही वाढत्या कोरोना रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली आहे.

The environment minister said that if this happened, it would be Corona's fourth, but
पर्यावरण मंत्री म्हणाले हे झालं तर ती कोरोनाची चौथी असेल, पण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्तीच्या वृत्ताला फेटाळलं आहे.
  • कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
  • काश्मिरी पंडितांनी महाराष्ट्रात राहण्यास यावे- पर्यावरण मंत्री

maharashtra Corona Update :  मुंबई :  काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona ) रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात पटीने वाढली आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांविषयी अनेक राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही वाढत्या कोरोना रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास चौथी लाट येण्याची भीती व्यक्त आदित्य ठाकरेंनी केली आहे. कदाचित ही चौथी लाट असेल, परंतु, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. लोकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यायची आहे, शिवाय कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यात पुन्हा मास्क बंधणकारक करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,  “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) मार्गदर्शक तत्त्वे जारी करेपर्यंत आम्ही थांबलो आहोत. जेव्हा केंद्र सरकार नियम जारी करेल तेव्हा आम्ही देखील प्रोटोकॉल लागू करू.”  "सध्या राज्यात कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत असल्यामुळे त्याला आपण चौथी लाट म्हणता येईल. परंतु, घाबरायचं कारण नाही, फक्त सूचनांचे पालन करा, रुग्ण वाढत असले तरी चिंताजनक परिस्थिती नाही. मात्र, सर्वांनी मास्क वापला पाहिजे," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

नवी मुंबईत झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "वृक्ष तोडणी होणार असे म्हटले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याची परवानगी दिलेली नसून तो प्रस्ताव आहे. या प्रस्तावार अभ्यास केला जात आहे. पर्यावरणासाठी आम्ही शाश्वत काम करत आहोत. 
दरम्यान, काश्मीर मधील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'काश्मिरी पंडितांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. आमच्या राज्यात त्यांचे स्वागत आहे. काश्मीरमधील परिस्थिती अजून सुधारलेली नाही. काश्मीरमधून जी माहिती समोर येत आहे ती चांगली नाही. आशा आहे की भारत सरकार यावर आपली भूमिका स्पष्ट करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी