Banner On Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं अजून लग्न नाही म्हणून ‘दिशा चुकली’, ही 'ती' नाही बॅनरबाजीवरुन भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 26, 2022 | 14:23 IST

पावसाळी अधिवेशाच्या (Monsoon Assembly Session)  सुरुवातील विरोधकांनी विधानभवनासमोर (Vidhan Bhavan) सरकारविरुद्धात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी-शेवटी सत्ताधाऱ्यांची विरोधकांविरुद्धात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) करण्यात आलेली वैयक्तिक टीका खूप चर्चेत राहिली.

Bharat Gogavle's explanation On Aditya Thackeray
आदित्य ठाकरेंचं अजून लग्न नाही म्हणून दिशा चुकली, - गोगावले  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरेंकडून सतत होणाऱ्या टीकेमुळे आणि आरोपामुळे शिंदे गटाने लक्ष्मण रेषा ओलांडली.
  • विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या तीन दिवसात विरोधकांकडून घोषणाबाजी

मुंबईः  पावसाळी अधिवेशाच्या (Monsoon Assembly Session)  सुरुवातील विरोधकांनी विधानभवनासमोर (Vidhan Bhavan) सरकारविरुद्धात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी-शेवटी सत्ताधाऱ्यांची विरोधकांविरुद्धात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) करण्यात आलेली वैयक्तिक टीका खूप चर्चेत राहिली. आदित्य ठाकरेंवरील टीकेवरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawle) यांनी दिलंय. परंतु स्पष्टीकरण जरी दिले असेल तरी आदित्य ठाकरेंना त्यांनी परत टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यंग ब्लड आहे. अजून त्यांचं लग्नही झालेलं नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका करणार नाहीत, असं स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले.  (Aditya Thackeray is not married yet, 'Disha is wrong', not 'she', Bharat Gogavle's explanation on banner )

उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंविरुद्धात टीका करणार नाही असं शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. एव्हना त्यांना काही प्रमाणात त्यांनी तो नियम पाळला देखील परंतु आदित्य ठाकरेंकडून सतत होणाऱ्या टीकेमुळे आणि आरोपामुळे शिंदे गटाने ती लक्ष्मण रेषा ओलांडली.   या अधिवेशनात सत्ताधारी आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारं एक बॅनर आंदोलनात वापरण्यात आलं. या बॅनरवरील फोटो आणि त्यावरील मजकुरामुळे आदित्य ठाकरेंवर वैयक्तिक टीका केल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आदित्य ठाकेरेंवर अशी व्यक्तिगत टीका करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असं आज भरत गोगावले यांना स्पष्ट करावं लागलं.

Read Also : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडली, दिला राजीनामा

पोस्टर नेमकं काय?

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या तीन दिवसात विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर पन्नास-खोके एकदम ओके.. अशी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. त्यानंतर अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी शिंदे गटानेही आपले हात सावरत विरोधकांच्या आधीच आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकावले. शिंदे गटातील नेते शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करत होते. 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं होते. 

Read Also : कुटुंबातील पाच जणांचा खून केल्यानंतर युवकाची आत्महत्या

या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. युवराज…2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली आणि 2019 ला खुर्चीसाठी हिंदुत्वावादी विचारधारा पायदळी तुटवली, अशा शब्दात आरोप बॅनरवरुन करण्यात आला. एवढच नाही तर आदित्य ठाकरे ज्या वेगाने महाराष्ट्रभर दौरे करतायत, त्यावरही शिंदे गटाने टीका केली. 

Read Also : तुमचा IQ असेल ग्रेट तर डोकं न खाजवता शोधा तिसरा प्राणी

पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर… सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.. खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार अन् सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार.. जनता हे खोटे अश्रू आता पूसणार नाही, तुमच्या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही, अशा घोषणा या बॅनरवर लिहिण्यात आल्या. युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली हे वाक्यही मोठ्या अक्षरात या बॅनरवर लिहिण्यात आले होते.

स्पष्टीकरणात काय म्हणाले भरत गोगावले?

आदित्य ठाकरेंना आंदोलनातून टार्गेट करताना भरत गोगावले म्हणाले,  ‘ दिशाचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी आघाडी करायला नको होती. भाजपसोबत युती करायचा हवी होती. दोन अडीच वर्ष पाहिलंत, आम्हाला कमी-कमी करत चालले होते. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं काम यांनी घेतलंय, असं म्हणून आम्ही म्हणतोय. अजित पवार म्हणाले पुढच्या वेळेला मिशन १००… ते आमच्याच जोरावरती. उद्धव साहेबांना सांगायचे ५ वर्ष मुख्यमंत्री तुम्ही आणि इकडे खजिना घेऊन परस्पर विल्हेवाट लावत होते. म्हणून आम्ही दिशा चुकली म्हटलो… आम्ही त्यांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर बोललो नाही. ते यंग ब्लड आहेत. अजून त्यांचं लग्न झालेलं नाही..

ती दिशा कोण?

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हिच्यासोबत आदित्य ठाकरे यांचं नाव वारंवार जोडलं जातं. हे दोघंही चांगले मित्र आहेत. मात्र दोघांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. दोघांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रश्न वारंवार त्यांना विचारण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी