आदित्य ठाकरे या ठिकाणाहून लढवू शकतात विधानसभा निवडणूक?

मुंबई
Updated Jun 11, 2019 | 17:26 IST

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यात ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

aaditya thackeray
आदित्य ठाकरे 

मुंबई :  बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील कोणत्याही सदस्याने आतापर्यंत निवडणूक लढली नाही आहे. तसेच जनतेतून निवडून गेलेला नाही आहे. पण यंदा पहिल्यांदा ठाकरे कुटुंबियांतील आदित्य ठाकरे विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी हालचालही शिवसेनेकडून केली जात आहे.  या संदर्भात शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदार संघाची चाचपणीही सुरू आहे.  या संदर्भात संभाव्य मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 

आदित्य ठाकरे यांना सध्या सुरक्षित मतदार संघ कोणता हे शोधण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी, माहिम, शिवडी किंवा वांद्रे पूर्व हा मतदार संघ सुरक्षित असल्याचे मानले जाते. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादर येथील शिवसेना भवनात बैठक घेतली. तर शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या वरळी मतदार संघातील आमदार सुनील शिंदे यांनी आपल्याकडील जागा सोडण्याची स्वतःहून तयारी दर्शवली आहे. 

ठाकरे कुटुंबातील ही सर्वात प्रथम निवडणूक असणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आदित्य यांना उमेदवारी जाहीर झाली तर ते कोणत्या विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर होते याकडे लागून राहिल्या आहेत. तशी चाचपणी ही आदित्य ठाकरे स्वतः करत आहेत.  या संदर्भात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवनात पार पडली. आदित्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते आहे. 

आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पूर्व,  वरळी आणि माहिम येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी या बाबत चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे.  आदित्य ठाकरे सक्रिय राजकारणात सामील होणार याची पहिली बातमी ही लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-सेना युती झाली तेव्हाच आली होती.  भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली, त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते.  उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. त्यावर अमित शहा यांनी हे पद दिले असे म्हणून लोकसभेतील युतीवर शिक्का मोर्तब केले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेच पुन्हा सत्ता आली तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आदित्य ठाकरे या ठिकाणाहून लढवू शकतात विधानसभा निवडणूक? Description: लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यात ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles