Aditya Thackeray : खाते वाटपानंतर आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्मावर बोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधीनंतर पाच दिवसांनी खाते वाटप झाले. त्यांनतर आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार टिका केली.

Aditya Thackeray targets Eknath Shinde government after allocation of accounts
Aditya Thackeray : खाते वाटपानंतर आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्मावर बोट   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे गृहखाते दिले आहे.
  • खातेवाटपानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. स्वत: शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे गृहखाते दिले आहे. शिंदे यांनी नगरविकास खाते आपल्याकडेच ठेवले आहे. फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन ही खातीही असतील. (Aditya Thackeray targets Eknath Shinde government after allocation of accounts)

अधिक वाचा : Thane : झेंडावंदनावरुन विचारे-शिंदेंमध्ये सामना, ठाकरे गटातील शिवसैनिकांना नोटीस

त्याचवेळी भाजपच्या कोट्यातून मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे नवे महसूल मंत्री असतील. सुधीर मुनगंटीवार यांना वनमंत्री करण्यात आले असून, यापूर्वी २०१४ च्या मंत्रिमंडळात ते खाते त्यांच्याकडे होते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत, ते संसदीय कामकाजही पाहणार आहेत.

अधिक वाचा : राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटातून दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण, तर अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे ठाकरे सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता खाते देण्यात आले. तर दादा भुसे आता बंदर आणि खाणी विभागाच पदभार स्विकारणार आहेत. संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन, संदीपान भुमरे यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय सामंत यांना उ्दयोग, व तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते देण्यात आले आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले, जेव्हा राज्य कारभारापेक्षा सत्तेवरच लक्ष्य केंद्रित असतं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४१ दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला ५ दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी