अॅड. गुणरत्न सदावर्तेंना कोठडी की जामीन? आज निर्णय

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 11, 2022 | 07:43 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली होती.

Adv. Bail for Gunaratna Sadavarte? Decide today
अॅड. गुणरत्न सदावर्तेंना कोठडी की जामीन?   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं.
  • अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांच्या पथकाची झाडाझडती

Gunratna Sadavarte : मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीचे दिवस पूर्ण झाले असून त्यांना पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी (Metropolitan Magistrate) कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. त्यामुळं त्यांना कोठडी वाढवून मिळणार की जामीन होणार याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेतली असल्याची माहिती आहे.  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सोमवारी दोन दिवसांची पोलीस कस्टडी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एखादा सबळ पुरावा शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी