Gunratna Sadavarte : व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारे सदावर्ते घराचा मेन्टेनन्सही भरत नाही, शेजारील रहिवाशांनी वाचला तक्रारीचा पाढा

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. व्हॅनिटी व्हॅन वापरणारे सदावर्ते जिथे राहतात त्या इमारतीचा मेन्टेनन्सही भरत नाहीत, तसेच त्यांच्या घरात ५० ते १०० माणसांचा राबता असतो त्यामुळे इतर रहिवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार शेजार्‍यांनी केली आहे.

advocate gunratna sadavarte
वकील गुणरत्न सदावर्ते   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे.
  • व्हॅनिटी व्हॅन वापरणारे सदावर्ते जिथे राहतात त्या इमारतीचा मेन्टेनन्सही भरत नाहीत.
  • तसेच त्यांच्या घरात ५० ते १०० माणसांचा राबता असतो त्यामुळे इतर रहिवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार शेजार्‍यांनी केली आहे.

Adv. Gunratna Sadavarte : मुंबई : शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. व्हॅनिटी व्हॅन वापरणारे सदावर्ते जिथे राहतात त्या इमारतीचा मेन्टेनन्सही भरत नाहीत, तसेच त्यांच्या घरात ५० ते १०० माणसांचा राबता असतो त्यामुळे इतर रहिवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार शेजार्‍यांनी केली आहे. इतकेच नाही तर सदावर्ते यांच्या इमारतीत राहणार्‍या एका महिला आणि ज्येष्ठ महिलेला सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मारहाण केल्याचे या महिलेने म्हटले आहे. 

अधिक वाचा : मुंबईच्या सलग पराभवाचे काय आहे अर्जुन तेंडुलकरशी कनेक्शन...अझरुद्दीनचा मोठा खुलासा

डॉ. प्रियंका शेट्ये या वकील गुणरत्न सदावर्ते जिथे राहतात त्याच इमारतीतील रहिवासी आहे. डॉ. शेट्ये या पेशाने डेंटिस्ट असून वांद्रे आणि वरळीत त्यांचे क्लिनिक आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्ये यांनी सदावर्ते कुटुंबीयांनी किती त्रास दिला याची माहिती दिली. डॉ. शेट्ये म्हणाल्या की वकील सदावर्ते एखाद्या हिरोसारखी व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरतात, परंतु ते इमारतीचा मेन्टेनेनन्सही भरत नाहीत. इमारतीत कुठल्याही प्रकारे पार्किंगची परवानगी नसताना सदावर्ते आणि त्यांच्याकडे आलेल्या लोकांच्या शेकडो गाड्या इमारतीखाली उभ्या असतात.

अधिक वाचा : Gunratna Sadavarte : कामगार नेत्याचे धक्कादायक वक्तव्य,सदावर्तेंची जीभ कापून आणणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस!

तसेच सदावर्ते यांच्या घरात नेहमी ५० ते १०० लोकांचा राबता असतो. हे लोक नेहमी आपल्याकडे एकटक बघत असतात असे डॉ. शेट्ये म्हणाल्या. एकदा डॉ. शेट्ये काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या तेव्हा सदावर्ते यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीने चुकीचा स्पर्श केल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. याची तक्रार शेट्ये यांनी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे केली. जयश्री पाटील यांनी दिलगीरी व्यक्त करण्या ऐवजी आपल्याला मारहाण केली इतकेच नाही तर आपल्या वृद्ध आईलाही मारण केल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. 

अधिक वाचा :  कळस यात्रेदरम्यान दोन गटात राडा; 8 ते 10 लोक जखमी, 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर उलट जयश्री पाटील यांनी कायद्याचा धाक दाखवत आपल्याला माफी मागण्यास लावल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले इतकेच नाही तर पुन्हा पोलिसांत गेल्यास जातीवरून शिवीगीळ केल्याच्या आरोपावरून तक्रार करण्याची धमकीही जयश्री पाटील यांनी दिल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला, ते आपल्यालाही मारण्यास कमी करणार नाही अशी भिती डॉ. शेट्ये म्हणाल्या. परंतु सध्या सदावर्ते यांच्यावर सध्या कारवाई झाल्याने डॉ. शेट्ये यांनी समाधान व्यक्त केले. 

अधिक वाचा : Prashant Kishor: प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसला दिला 'प्लॅन 370', सांगितला २०२४ च्या विजयाचा मार्ग 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी