Gunratna Sadawarte : वकील गुणरत्न सदावर्तेंचा जामीन फेटाळला, दोन दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन आणि हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांच्यासह एसटीच्या १०९ कामगारांनाही अटक करण्यात आली होती. आज यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदावर्तेंचा जामीन फेटाळला आहे.

gunratna sasavarte
गुणरत्न सदावर्ते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन आणि हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे.
  • सदावर्ते यांच्यासह एसटीच्या १०९ कामगारांनाही अटक करण्यात आली होती.
  • आज यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदावर्तेंचा जामीन फेटाळला आहे.

Gunratna Sadawarte : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन आणि हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांच्यासह एसटीच्या १०९ कामगारांनाही अटक करण्यात आली होती. आज यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदावर्तेंचा जामीन फेटाळला आहे तसेच त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. १०९ कामगारांना २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सात एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. या प्रतिक्रियेला प्रेरीत होऊन आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच पोलिसांना माहिती मिळाली होती. आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरीदेखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाहीत. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरिता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान आंदोलक शरद पवार यांच्या घरावर जाणार असल्याची माहिती असताना पोलीस तेथे का पोहोचले नाही याविषयी प्रश्न उपस्थित होतं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी