Aaditya Thackeray: 'मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात', आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 17, 2022 | 21:18 IST

Aaditya Thackeray on MLA: मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे गटातील काही आमदार असमाधानी आहेत, ते आमचे संपर्क आहेत, असा मोठा दावा माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

after cabinet expansion some mlas of shinde group are in touch with us reveals aaditya thackeray
'मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार संपर्कात' 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
  • महिला आणि मुंबईकडे दुर्लक्ष केल्याची आदित्य ठाकरेंकडून टीका
  • शिंदे गटातील काही आमदार असमाधानी, आदित्य ठाकरेंचा दावा

Shiv Sena: मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शिवसेना (ShivSena) नेते आणि माजी राज्यमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बुधवारी असं म्हटले की, खरा मुख्यमंत्री कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अंगुलनिर्देश केला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मंत्रिमंडळाने ना मुंबईचा आवाज ऐकला ना महिला किंवा अपक्ष आमदारांचा.' (after cabinet expansion some mlas of shinde group are in touch with us reveals aaditya thackeray)

त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी असाही दावा केला की, 'एकनाथ शिंदे गोटात अडकलेले काही लोक आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमच्याशी संपर्क साधत आहेत. परत सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना तिथे राहायचे असेल त्यांनी राजीनामा द्या आणि आम्हाला निवडणुकीत सामोरे जा.' असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: 'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, त्यात बंडखोर शिवसेना कॅम्प आणि त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या भाजपमधील प्रत्येकी 9-9 आमदारांचा समावेश केला. एकाही महिला आमदार किंवा अपक्षाचा मंत्रिमंडळात समावेश नाही. मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 20 झाली आहे. जूनमध्ये शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड करून शिंदे यांच्याशी युती केलेल्या पहिल्या 14 ते 15 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

'त्यामुळे निष्ठेला जागा नाही', अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. 'खरा मुख्यमंत्री कोण आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे, फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि इतर अनेक महत्त्वाची खाती आहेत.'असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

अधिक वाचा: "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच देशमुख, मलिकांना भेटणार"

ते पुढे बोलताना म्हणाले की, 'विस्तारानंतर पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने शिंदे सरकारवर टीका करत भाजपला महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. अपक्षांना स्थान मिळाले नाही. मंत्रिमंडळात ना महिलांना स्थान मिळाले आहे ना मुंबईत.' असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांच्या शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या रायगड येथे सुरू झाला आहे. आज त्यांनी अलिबाग येथे रॅली काढली होती. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी