Auto and Taxi Fair : मुंबई: मुंबईत सीएनजीची किंमत कमी (CNG Price Decreased) झाली आहे. असे असले तरी मुंबईतील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन (Auto Rikshwa and Taxi Union) प्रवास भाडे वाढवण्याची (Price Hike Demand) मागणी करत आहेत. मुंबईत सीएनजीच्या किंमती कमी झाल्यानंतर टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे आभारही मानले होते. (after cng price reduced auto rikshaw and taxi union demand fair hike)
Maharashtra | Compressed Natural Gas (CNG) price in Pune city decreased by Rs 4. Now it will cost Rs 87 per kg: Ali Daruwala, Spokesperson, All India Petrol Dealers Association — ANI (@ANI) August 16, 2022
सीएनजीच्या किंमती जरी कमी झाल्या असल्या तरी त्या फार कमी झाल्या आहेत असे टॅक्सी आणि रिक्षा युनियनचे म्हणणे आहे. मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी महानगर गॅस लिमिटेडने सीनजी दरात ६ रुपये तर पीएनजीच्या दरात ४ रुपये प्रति किलो दर कमी केले आहेत. सद्य काळात सीनजीची किंमत ८० रुपये किलो आहे. जर पीएनजीची प्रतिकिलो किंमत ४८.५० पैसे इतकी आहे. टॅक्सीसाठी दीड किमी प्रवासासाठी २५ रुपये आकारले जातात, त्यात वाढ करून ३५ रुपये करावे अशी मागणी टॅक्सी युनियनने केली आहे.
अधिक वाचा : पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टची सवलत योजना
दुसरीकडे रिक्षाचे कमीतकमी भाडे २१ रुपये आहे, त्यात वाढ करून २४ रुपये करावे अशी मागणी टॅक्सी युनियनने केली आहे. पहिल्या किमीनंतर कमीतकमी भाडे १४.२० रुपये इतके आहे त्यात वाढ करून १६ रुपये करावे अशीही मागणी रिक्षा युनियनने केली आहे.
अधिक वाचा : मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.