'साहेब एक मोठा निर्णय घ्या' शिवसेनेच्या नेत्याची पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना विनंती

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 21:42 IST

After Eknath Shinde now Shiv Sena MP Bhavana Gawli writes letter to Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपलं मत मांडलं आहे.

Uddhav Thackeray
'साहेब एक मोठा निर्णय घ्या' शिवसेनेच्या नेत्याची पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना विनंती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असतानाच आता शिवसेनेच्या खासदारांकडूनही उद्धव ठाकरेंना एक विनंती करण्यात आली आहे.
  • मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप आले असताना अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत आमदारांचा एक गट ठेवला आहे. तसेच पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) चालवण्यावर ठाम असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबूक लाईव्ह (Uddhav Thackreay Facebook Live) करत जनतेशी संवाद साधला आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना एक भावनिक आवाहनही केलं. मात्र, असे असतानाच आता एक नवी घडामोड होताना पहायला मिळत आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असतानाच आता शिवसेनेच्या खासदारांकडूनही उद्धव ठाकरेंना एक विनंती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रातून खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना एक खास विनंती केली आहे.

काय म्हटलं आहे भावना गवळींनी पत्रात?

आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे.

आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. करीता त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा हीच सेवेशी पुनश्च नम्र विनंती करते.

मुंबईत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

तर मुंबईत शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेनेच्या मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी