संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर रोहित पवारांकडून 'वाघा'चा जबरदस्त व्हिडिओ ट्विट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वाघाचा एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे.

After Sanjay Raut gets bail, Rohit Pawar tweets awesome 'tiger' video
रोहित पवारांकडून 'वाघा'चा जबरदस्त व्हिडिओ ट्विट  
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वाघाचा एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे.
  • रोहित पवार यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर एका वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
  • हा वाघ एका पिंजऱ्यात आहे

मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात 100 दिवसांनंतर जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वाघाचा एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे. (After Sanjay Raut gets bail, Rohit Pawar tweets awesome 'tiger' video)

रोहित पवार यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर एका वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा वाघ एका पिंजऱ्यात आहे. त्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर वाघ त्या पिंजऱ्यातून उडी घेऊन जंगलात दाखल होतो. 

रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करताना त्यावर सत्यमेव जयते असे लिहिले आहे.  महाविकास आघाडीतील तीन नेते आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरूंगात आहेत. यातील अनिल देशमुख यांना एका प्रकरणात दिलासा मिळाला. पण अजून त्यांची सुटका झालेली नाही. त्यानंतर आज संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला नवाब मलिक यांना जामीन मंजूर होतो की ना याची प्रतिक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी