Collages Reopening: शाळांनंतर आता कॉलेजदेखील सुरू होणार, उदय सामंत यांनी दिले संकेत 

Maharashtra College Reopening: आता राज्यातील कॉलेज  कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लवकरच हा निर्णय घेण्यात येईल असे संकेत दिले आहेत.

After schools, now college will also start in Maharashtra hinted by Minster Uday Samant
Collages Reopening । शाळांनंतर आता कॉलेजदेखील सुरू होणार 
थोडं पण कामाचं
  • शाळांपाठोपाठ कॉलेज देखील सुरु होण्याची शक्यता
  • उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • उदय सामंत यांनी दिले संकेत

College Reopening in Maharashtra । मुंबई  : गेल्या महिन्यात वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांमुळे राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ऑफलाइन (Offline) बंद असलेल्या शाळा सोमवार २४ जानेवारीपासून कमी रुग्ण संख्या असलेल्या शहरात सुरू होणार आहेत. नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यास ठाकरे राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील कॉलेज  कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लवकरच हा निर्णय घेण्यात येईल असे संकेत दिले आहेत. (After schools, now college will also start in Maharashtra hinted by Minster Uday Samant)

राज्यातील कॉलेज सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी माध्यमांना दिली. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि त्यावर विचार आणि निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार असल्याचे ते म्हणाले.

वाढत्या कोरोना पेशंटमुळे राज्यातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत ऑफलाइन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ऑनलाइन वर्ग सुरू राहणार असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. याआधी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमधील शाळा कोरोना रुग्णसंख्येमुळे बंद होत्या. 

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या ठिकाणी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरसकट सर्व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली होती. काही काळ दहावी आणि बारावीचे वर्गही ऑनलाइन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या. 

शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाचा विविध स्तरातून विरोध करण्यात आला. तसेच पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरु ठेवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.  अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा दाखवला होता. पण राज्य सरकारने सर्वांची मागणी लक्षात घेता २४ तारखेपासून शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. आता अशाच स्वरूपाचा निर्णय आज किंवा उद्यामध्ये कॉलेजच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. तसे संकेत उदय सामंत यांनी दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी