संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर शिंदे गटाला आनंद गगनात मावेना; 'या' नेत्यानं दिली ही प्रतिक्रिया

mla sanjay shirsat on shivsena leader sanjay raut : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट राऊत यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी त्याचबरोबर, ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. 

The leader of the Shinde group predicted 'this' possibility about Sanjay Raut
शिंदे गटातील नेत्यानं संजय राऊतांविषयी वर्तवली 'ही' शक्यता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल – संजय शिरसाट
  • नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल – संजय शिरसाट
  • राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत राऊत  (Sanjay Raut)  यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज सकाळी छापेमारी केली आहे. यावेळी, ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची देखील चौकशी करत असल्याची माहिती आहे. राऊत यांच्या घरी पडलेल्या छापेमारी नंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिकिया समोर आली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट राऊत यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी त्याचबरोबर, ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह ४० आमदार आणि १२ खासदारही आनंदी असतील अशी  प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे देखील शिरसाट यांनी म्हटले आहे.

राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल – संजय शिरसाट

दरम्यान, पुढे बोलताना शिरसाट यांनी म्हटलं आहे की, ईडीची कारवाई कायद्यानुसार  होत असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल असेही शिरसाट यांनी म्हटलं आहे. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले. राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Read Also : खासदार संजय राऊतांना सोमय्यांनी संबोधलं माफिया

नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल – संजय शिरसाट

नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये असेही शिरसाठ यांनी म्हटले. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी ४० वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

Read Also : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक

राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले

आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत का असावं याबाबत सातत्याने सांगायचे. त्याचाच हा परिणाम असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एक दिवस उद्धव ठाकरे हेच संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढतील असे शिरसाट यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले असल्याचा आरोप देखील शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी