BREAKING : खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर संभाजीराजेंची 'नवी दिशा, नवा पर्याय...',

मुंबई
भरत जाधव
Updated May 10, 2022 | 19:37 IST

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे (BJP) राज्यसभेचे (Rajya Sabha) खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) आता लवकरच नवीन राजकीय (Political) भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते (Leader Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) भेट घेतली होती.

Sambhaji Raje will leave BJP?
खासदारकीची टर्म संपत आली संभाजीराजें भाजप सोडणार?   |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे (BJP) राज्यसभेचे (Rajya Sabha) खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) आता लवकरच नवीन राजकीय (Political) भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते (Leader Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे त्यावेळी  मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

राज्यसभा खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज सकाळीच संभाजीराजे यांनी  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, 'माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण काही जे बोलायचे आहे ते मी 12 मे ला बोलणार आहे', अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली होती.

त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळावा जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी...नवी दिशा, नवा विचार  आणि नवा पर्याय...' असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होणार ही शक्यता आता मावळत चालली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी