नांदेडमध्ये तलवारी जप्त झाल्यानंतर राम कदमांनी राज्य सरकारवर डागली तोफ; म्हणाले, हिंसा घडवून सरकार हिंदुत्व संघटनांना अडकवणार

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 29, 2022 | 16:48 IST

काल धुळ्यात (Dhule) पोलिसांनी (police) मोठ्या प्रमाणात तलवारी (Sword) जप्त केल्यानंतर आज नांदेडमध्ये (Nanded) तलवारी (Sword) सापडल्या आहेत. यावरुन महाराष्ट्रात (Maharashtra) घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Ram Kadam Attack on state government
राज्य सरकार हिंसा घडवून हिंदूत्व संघटनांना अडकवणार   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात कोणाला घातपात घडवायचा आहे? नांदेडमध्ये तलवारी जप्त
  • नांदेडमध्ये एका ऑटोतून 25 तलवारी नेल्या जात होत्या.
  • धुळ्यात काल पोलिसांनी तब्बल 90 तलवारी जप्त केल्या.

नांदेड : काल धुळ्यात (Dhule) पोलिसांनी (police) मोठ्या प्रमाणात तलवारी (Sword) जप्त केल्यानंतर आज नांदेडमध्ये (Nanded) तलवारी (Sword) सापडल्या आहेत. यावरुन महाराष्ट्रात (Maharashtra) घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरुन भाजप नेते (BJP leader) राम कदम (Ram Kadam) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकार (Thackeray government) महाराष्ट्रात हिंसा (Violence) घडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नांदेडमध्ये एका ऑटोतून 25 तलवारी नेल्या जात होत्या. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानं संशयावरून तपासणी केली असता या तलवारी आढळून आल्या. गोकुळनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अमृतसरहून सचखंड रेल्वेने तलवारी आणल्या गेल्या होत्या. केवळ विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणल्या होत्या, की काही घातपाताचा कट होता, याची चौकशी पोलीस करण्यात येत आहे.यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याची सुरुवात राम कदम यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार स्वत: हिंसा घडवून आणणार आणि त्याचा आरोप हिंदूत्व संघटनांनावर टाकेल, असा आरोप कदमांनी केला आहे.  

काल धुळ्यात सापडल्या होत्या तलवारी

त्याआधी धुळ्यात काल पोलिसांनी तब्बल 90 तलवारी जप्त केल्या. मुंबई-आग्रा हायवेवर पेट्रोलिंग करताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने गाडी न थांबवता पुढे नेली, पोलिसांनी पाठलाग करुन गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता गाडीत तब्बल 90 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. दरम्या राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडत असल्यानं महाराष्ट्रात हिंसा घडवण्याचा कट रचला जात आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणावर तलवारी कोण आणि का मागवत आहे? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी