Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' चक्रीवादळाचा (Mandos Cyclone) परिणाम काही राज्यांमध्ये दिसून येत असून वातावरणात मोठा बदल झाला आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्याता आला आहे. (cyclone news) मंदोस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. (Cyclone in Maharashtra) त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंदोस चक्रीवादळानं चेन्नईच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. त्यामुळे तिथे जोराच्या वाऱ्यासह पाऊस (Rain) पडत आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. अलर्टवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरमचा समावेश आहे. (Aftermath of Cyclone Mandos; somewherecloudy and forecast of rain )
अधिक वाचा : लग्नासाठी जोडीदार निवडताना 'या' गोष्टी ठेवा डोक्यात
महाराष्ट्रावरही (Maharashtra) या चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (India Meteorological Department) देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंदोस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. या चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडीचा जोर कमी झाला आहे. 11 ते 13 डिसेंबर यादरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ होत आहे, पण पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने हवामानात मोठा बदल होण्यीच शक्यता आहे.
अधिक वाचा :भिकल्या धिंडांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. महाराष्ट्रात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा देखील राज्यात परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान विदर्भात तापमानाचा पारा घसरला आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.
परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. यंदाच्या मोसमातीलल सर्वात निचांकी तापमानाची नोंद परभणीत आज झाली आहे. तापमानाचा पारा 6.3 अंश सेल्सिअस एवढा घसरला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.