Thane Beautification : ठाणे शहर होणार चकाचक, नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर

Thane Beautification : लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर चकाचक होणार आहे. ठाणे शहराच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या नव्या वर्षात ठाणे शहराला नवी झळाळी मिळणार आहे.

thane city
ठाणे शहर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत.
  • त्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर चकाचक होणार आहे.
  • ठाणे शहराच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Thane Beautification :  ठाणे : लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर चकाचक होणार आहे. ठाणे शहराच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या नव्या वर्षात ठाणे शहराला नवी झळाळी मिळणार आहे. (ahead of thane municipal corporation election 2022 100 crore fund for city beautification by state government)

अधिक वाचा : Jalgaon : महाप्रबोधन यात्रेत राडा, शिवसेनेच्या आक्रमक नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई पाठोपाठ ठाणे हे शहरही गर्दीने गजबलेले असते. आता ठाण्यातील सहा प्रवेशद्वारांचे नूतनीकरण होणार आहे. त्यात पूर्व द्रुतगती मार्ग, रेल्वे स्थानक, आणि उड्डाणपूलांचा समावेश आहे. या ठिकाणांवर नवा रंगा लावण्यात येणार असून सुंदर सुंदर चित्रही काढली जाणार आहेत. 

अधिक वाचा :  BHANDARA । रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...


ठाण्याच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी नगरविकास खात्याकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यात मेट्रोच्या कामाचांही समावेश आहे. अनेक कामांच्यावेळी ढिगारे तसेच्या तसे पडून आहेत. आता दुरुस्तीच्या कामातून हे ढिगारे हटवले जातील. शहरात अनेक ठिकाणी फूटपाथ दुरुस्त केले जातील. तसेच फ्लायओव्हरच्याखाली अनेक बेवारस वाहनं आहेत. ही वाहने हटवून ही जागा मोकळी करण्यात येतील. आनंदनगर टोल प्लाझा इथे 25 फूट दिव्यांचा खांब उभारला जाईल. नवी मुंबईत अनेक ठिकाणी भुयारी मार्गांवर, तालावांजवळ दिवे लावण्यात आले होते. त्याच धरतीवर ठाण्यात अनेक ठिकाणी दिवे लावले जातील.  ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरही सौंदर्यीकरण केले जाईल. त्यामुळे शहराचा कायापालट होईल. शहरांच्या भिंतीवर सुंदर चित्र रंगवण्यासाठी स्थानिक कलाकारांची मदत घेतली जाणार आहे. अनेक ठिकाणी 3D पेंट काढले जातील. शहरातील उद्यानांचेही दुरुस्तीकरण केले जाईल. तसेच दररोज उद्यानांची देखभाल करण्यासाठीही प्रशासनाने निर्देश दिले आहेत. यानूतनीकरणाच्या माध्यामतून शहराचा वारसा नागरिकांना दिसेल अशी आशा प्रशासनने व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी