Ahmednagar District Civil Hospital fire अहमदनगर रुग्णालयाच्या आग प्रकरणात दोषींवर कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 09, 2021 | 00:15 IST

Ahmednagar district civil hospital fire suspension of three medical officers and one nurse, termination of service of two nurses । अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला शनिवार ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात आली.

Ahmednagar district civil hospital fire suspension of three medical officers and one nurse, termination of service of two nurses
अहमदनगर रुग्णालयाच्या आग प्रकरणात दोषींवर कारवाई 
थोडं पण कामाचं
  • अहमदनगर रुग्णालयाच्या आग प्रकरणात दोषींवर कारवाई
  • चौघांचे निलंबन आणि दोघांची सेवा समाप्त
  • विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्यांवर कारवाई

Ahmednagar district civil hospital fire suspension of three medical officers and one nurse, termination of service of two nurses । मुंबईः अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला शनिवार ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे या चौघांचे निलंबन करण्यात आले. तसेच स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चन्ना आनंत या दोघांची सेवा समाप्त करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी