विनायक मेटेंच्या अपघातासाठी कारचालकाची डुलकी कारणीभूत असावी; अजित पवारांना शंका

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 14, 2022 | 12:44 IST

मुंबई- पुणे (Mumbai - Pune) या द्रुतगती महामार्गावर (expressway) भातान बोगद्याजवळ (Bhatan Tunnel) शिवसंग्राम पक्षाचे  (Shiv Sangram Party) नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांच्या कारला भीषण अपघात (accident) झाला असून यात विनायक मेटे याचे निधन झाले.

Ajit Pawar blames car driver's sleepiness for the accident
मेटेंच्या अपघातासाठी कारचालकाची डुलकी कारणीभूत- अजित पवार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अजित पवार यांनी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
  • विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.
  • लोकांनी रात्रभर प्रवास करणं हे नेहमी टाळलं पाहिजे- अजित पवार

मुंबई :  मुंबई- पुणे (Mumbai - Pune) या द्रुतगती महामार्गावर (expressway) भातान बोगद्याजवळ (Bhatan Tunnel) शिवसंग्राम पक्षाचे  (Shiv Sangram Party) नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांच्या कारला भीषण अपघात (accident) झाला असून यात विनायक मेटे याचे निधन झाले.  विनायक मेटेंच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. मात्र, त्याचबरोबर या अपघातावर संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप होत असतानाच विधानसभा (Legislative Assembly) विरोधी पक्षनेते (Leader Opposition) अजित पवार यांनी या अपघातासाठी त्यांच्या कारचालकाची डुलकी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली.

Read Also : ऑलिम्पिकमधील पराभवानंतर विनेश सोडणार होती कुस्ती

अजित पवार यांनी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय काळी पहाट झाली. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. माझे एक अतिशय जवळचे सहकारी असलेले विनायक मेटे आपल्यातून निघून गेले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका सतत ते मांडत होते. ते कुठेही असले, तरी अनेक वर्ष माझे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. चार दिवसांपूर्वी सकाळी ८ वाजता त्यांनी देवगिरी बंगल्यावर माझी भेट घेतली. मला १५ सप्टेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलं होतं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Read Also : उद्धव ठाकरेंच्या त्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर

“आम्ही एक चांगला सहकारी गमावला”

“गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा सोडला नाही. विनायक मेटेंनी मराठा समाजासाठी शिवसंग्राम संघटना स्थापन केली. ते पूर्वी आमच्यासोबत राष्ट्रवादीतही होते. आम्ही एकोप्यानं चर्चा करायचो. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक दौऱ्यांमध्ये सोबत होतो. एक चांगला सहकारी आम्ही सगळ्यांनी गमावला आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

चालकाच्या डुलकीमुळे अपघात झाला?

“मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीसाठी ते येत होते. माझं मत आहे की रात्रभर प्रवास करून येत असताना चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे सगळं घडलं. प्रवासात रात्रभर चालक जागा होता. त्यात चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हा अपघात झाला असेल. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून अजून चित्र स्पष्ट होईल. कारण हे सगळं कंटेनरच्या संदर्भातलं आहे. कंटेनरचा वेग आणि कारचा वेग किती असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे”, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं.आम्ही सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी रात्रभर प्रवास करणं हे नेहमी टाळलं पाहिजे. पण वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे अनेकदा ते टाळणं शक्य होत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी