बाबा रामदेव यांच्या 'कोरोनिल ' औषधावर, अजितदादांची पहिला प्रतिक्रिया 

Ajit pawar on baba ramdev :बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' औषध शोधल्याचा दावा केला आहे. या औषधाच्या लॉन्चनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawars first reaction on ramdev babas conoronil he says only those who believe in should take
बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषधावर अजितदादा म्हणाले  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे.
  • या औषधाच्या लॉन्चनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
  • ज्यांना बाबा रामदेव यांच्या औषधांवर विश्वास आहे, त्यांनी हे औषध घ्यावं अशी सूचक प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे. 

मुंबई  :  योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे औषध लॉन्च केले आहे. या औषधाच्या लॉन्चनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना बाबा रामदेव यांच्या औषधांवर विश्वास आहे, त्यांनी हे औषध घ्यावं अशी सूचक प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे. 

अजित पवार मुंबई येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असून या व्हायरसमुळे अनेक जण आजारी पडत आहे. अशात कोरोनाचे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. या व्हायरसला हरविण्यासाठी हे आयुर्वेदिक औषध प्रभावी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. त्यावर अजितदादांनी आपल्या शैलीत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यातील कोरोना संकटावर बोलताना अजित पवार म्हणाले, आगामी काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा काळ खूप कठीण आहे. राज्याच्या जनतेने स्वतःवरच बंधने घालून घेतली तर चांगले आहे. ही बंधने पाळली नाही तर त्याची फार मोठी किंमत राज्याला चुकवावी लागू शकते. आपण कालच १०३ ठिकाणी टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्ण समोर येत आहे.  सध्या लोकलमध्ये मनपा, राज्य सरकार आणि बँक कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण प्रवासाची परवागनी मिळावी यासाठी मागणी वाढत आहे. योग्य वेळ येताच त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

 भारतातील जनतेने चीनच्या वस्तू खरेदी न करण्याची भूमिका घेऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे. जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहतायंत त्यांच्याविषयी आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे, असंही भारत-चीन वादावर अजित पवार यांनी म्हटलं आहे.


५ ते १४ दिवसात रुग्ण बरे होण्याचा दावा

आचार्य बालकृष्ण यांनी याच महिन्यात काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, कंपनीने कोरोनावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्ण ५ ते १४ दिवसात बरे होतील. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर आम्ही शास्त्रज्ञांची एक टीम नेमली. प्रथम एक सिम्युलेशन केले गेले आणि त्या संयुगांची ओळख पटवली जे या व्हायरसशी लढा देऊ शकतील. जे शरीरात त्याचा प्रसार रोखू शकतील. मग, आम्ही शेकडो पॉझिटिव्ह रूग्णांवर क्लिनिकल केस स्टडी केली आणि आम्हाला १०० टक्के अनुकूल परिणाम मिळाले.'
 
 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी