Maharashtra Mini Lockdown news । मुंबई : राज्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. काल राज्यात दररोज 18 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनसह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकटाचा सामना करण्याासाठी सध्या मुंबई, ठाणे आणि पुण्यातील पहिली ते नववी आणि ११ वीच्या ऑफलाइन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ( ajit pawar holds Urgent meeting in Mantralaya with task force on maharashtra lockdown)
राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (ajit pawar ) मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार वीकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार नियमांप्रमाणे सर्व सुरू राहणार आहे. तर वीकेंड लॉकडाऊनमध्ये गार्डन्स, पार्क, चौपाट्या, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याची शक्यता आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.