ओबीसी आरक्षणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे इंपरिकिल डाटा गोळा होईपार्यंत निवडणूका नको अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. पवार सध्या सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण महत्वाचे आहे.
  • इंपरिकिल डाटा गोळा होईपार्यंत निवडणूका नको
  • जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको

ajit pawar on obc reservation : मुंबई :  ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे इंपरिकिल डाटा गोळा होईपार्यंत निवडणूका नको अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. पवार सध्या सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. तेव्हा अजित पवार म्हणाले की, ओबीसी इंपरिकल डाटा गोळा करण्यासाठी समितीने दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. हा डेटा गोळा करण्यासाथी तीन महिने लागले तरी चालेल परंतु जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.(ajit pawar on obc reservation and criticized union minister narayan rane )


सरकार पाडण्यासाठी आणखी एकाची भर

नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली आणि त्यात केंद्रीय नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाले. ये यश म्हणजे महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीची नांदी ठरेल असे भाकीत राणे यांनी केले. परंतु भाजपमध्ये अनेक लोक सरकार पडण्यासाठी टपले आहेत, त्यात आता फक्त नारायण राणेंची भर पडली अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पवार म्हणाले की, नारायण राणेंनी मागे असेच 1999 ते 2004 च सरकार पडण्याचा बराच प्रयत्न केला. तेव्हा विलासराव देशमुख यांचे सरकार होते. अनेक आमदारांना प्रलोभनं दाखवण्यात आली. परंतु ते सरकार  काही पडले नाही. ते सरकार तब्बल १५ वर्षे चाचले. २०१९ ला सगळी राजकीय समीकरणंच बदलली. कुठल्या पत्रकारालाही अंदाज आला नसेल की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. पण ते सरकार स्थापन झाले आणि आज या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे असेही पवार म्हणाले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी