१०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे - अजित पवार

फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे.

Ajit Pawar presented the list of how many crores of funds were given to those who said that NCP did injustice
१०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे - अजित पवार  
थोडं पण कामाचं
  • अहो फडणवीस... सारखं - सारखं एकनाथ शिंदे शिवसैनिक असल्याचं का सांगताय ;सर्वगुणसंपन्न होते तर त्यावेळी का जबाबदारीचं खातं दिलं नव्हतं - अजित पवार 
  • 'मिरच्या झोंबल्या' ते 'काय झाडी' वाल्यांना तर अजितदादा पवारांनी काढले चिमटे...  ज्या - ज्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला ते कधीच निवडून आले नाहीत... 
  • राष्ट्रवादीने अन्याय केला म्हणणार्‍यांना किती कोटीचा निधी दिला त्याची यादीच अजित पवार यांनी सभागृहात मांडली... 

मुंबई : फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येत असते जात असते. परंतु फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. फार स्तुती तुम्ही शिंदे यांची करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते तर रस्ते विकास हेच खाते का दिले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जनतेसाठी उपयोगी असणारे खाते एकनाथ शिंदे यांना का दिले नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केला. (Ajit Pawar presented the list of how many crores of funds were given to those who said that NCP did injustice ...)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनपर भाषणात बोलताना अजित पवार यांनी आजही सत्ताधाऱ्यांवर जोरदार बॅटींग केली. 

११ जुलैला बंडखोर आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. तरीसुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली गेली. अपात्रतेचे प्रकरण असताना ठराव का घेण्यात आला असा सवालही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 


विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी एकनाथ शिंदे व आम्ही राज्यपालांना भेटायचो त्यानंतर सगळे गेल्यावर राज्यपाल काय गप्पा मारायचे हे शिंदे तुम्हाला माहीत आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

 
#Live Now शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मविआ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी - मा. अजितदादा पवार मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपशी युती केली. तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी असल्याचा आरोप केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी भेदभाव करत असल्याचेही अनेकजण बोलत होते. वास्तविक मी सरकारमध्ये काम करत असताना कधीही, कोणताही भेदभाव केला नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी विधानसभेत केली. पूर्वी एक कोटी असलेला आमदार निधी वाढवत नेऊन आता पाच कोटी केला आहे. तरीही सातत्याने मी अन्याय केला असल्याचे सांगण्यात येत आहे, यात कोणतंही तथ्य नसल्याचे अजितदादा म्हणाले. सरकारच्या विश्वास दर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराच्या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी सरकार ज्या पद्धतीने बनले त्यावर जोरदार टीका केली. मा. अजितदादा म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला १२ हजार कोटी दिलेले आहेत. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला किती निधी दिला, याची आकडेवारीच त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. मंत्र्यांना निधी देताना शेवटी मा. मुख्यमंत्र्यांचीच मंजुरी लागते हे देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर होत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे अजितदादांनी सांगितले. मागच्या आठवड्याभरात मा. राज्यपाल भलतेच अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. सुप्रीम कोर्टात सदस्यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठराव घेणे उचित होते का? ठराव इतक्या घाईत आणण्याची गरज नव्हती, असे अनेक घटनातज्ज्ञ सांगत आहेत. मागच्या काळात आमचे सरकार असताना आम्ही अनेकदा राज्यपालांकडे जात होतो. विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रलंबित निर्णय त्यांनी घेतला नाही. अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावावरही त्यांनी निर्णय दिला नाही. मात्र आज ते भलतेच सक्रीय झाले आहेत, असे शरसंधान अजितदादांनी साधले. तसेच शिवसेना फोडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा शिवसैनिकांनी फुटीर नेत्यांचा टिकाव लागू दिला नाही. भुजबळ साहेब देखील शिंदे यांच्याप्रमाणे आमदार घेऊन बाहेर पडले होते. मात्र आमदार निवडून आले नाहीत. नारायण राणे यांच्यासोबत देखील तेच झाले, याची आठवणही मा. अजितदादा यांनी करुन दिली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मागच्या दहा-बारा दिवसांत सूरत, गुवाहाटी वरुन गोव्याला जावे लागले. मला वाटतं अख्ख्या हयातीमध्ये हे आमदार एवढे फिरले नसतील. भविष्यात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बंडखोर आमदारांना शिवसैनिक आणि जनतेला सामोरे जावे लागेल, असे अजितदादांनी स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण साहेबांना साजेसा कारभार करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना मा. अजितदादा पवार म्हणाले की, शिंदे यांचा आजवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे, हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. पण त्यांनी पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून हे पद मिळवले असते तर अधिक बरे झाले असते. शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण देखील सातारा जिल्ह्याचे होते. ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत पद्धतीने राजकारण केले, त्याप्रमाणेच चव्हाण साहेबांना शोभेल असे काम आपल्या सर्वांना करायचे असल्याचे आवाहन मा. अजितदादा पवार यांनी केले. Ajit Pawar Posted by Nationalist Congress Party - NCP on Sunday, July 3, 2022


सध्या राज्यपाल अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत असा खोचक टोला लगावतानाच नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यानंतर सव्वा वर्ष परवानगी द्यावी म्हणून आघाडीच्यावतीने राज्यपालांकडे मागणी करत होतो. मात्र आता निवड ताबडतोब झाली. इतकी फास्ट घटना पाहायला मिळाली की त्यामुळे राज्यातील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे असेही अजित पवार म्हणाले. 


तुम्ही शिवसेना सोडून गेलात तुमच्यासोबत ४० आमदार गेले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यातून काय मेसेज गेला ते लक्षात घ्या. ज्या - ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला किंवा करण्यात आला त्यानंतर पक्ष फोडणारा कधी निवडून आला नाही ही वस्तुस्थिती आहे हे उदय सामंत व गुलाबराव पाटील तुम्ही लक्षात ठेवा असे अजित पवार यांनी दोघांचे नाव घेत भविष्यातील घटनेचा सुतोवाच केला.


मिरच्या झोंबल्या पाहिजेत असे काहीतरी टाक असे संदीपान भुमरे बोलत असल्याची एक क्लीप बाहेर आली... भुमरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजेत अशी विचारणा करतानाच मग शहाजीबापूची काय झाडी... आलं... काय हे बापू... अशी टिपण्णी करताना ही मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणार ही नाही तुम्ही साधे आमदार आहात हे लक्षात घ्या असेही अजित पवार यांनी त्यांना सुचवले.


तिकडे गोव्यात काही आमदार मुख्यमंत्री शिंदे होणार जाहीर झाल्यावर नाचले... काही तर टेबलावर उभे राहून नाचले... आमदार हे योग्य नाही. बंडखोर आमदार कुठुन कुठे गेले हे राज्यातील जनता पाहत होती. अब्दुल सत्तार तर चांगलं बोलले बिर्याणी खायला जातो. पण अजून बिर्याणीबाबत एक चकार शब्द त्यांनी काढला नाही. सुरतला जाताना माझ्याजवळ दोन तास बसले होते हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले. 


शिंदे तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून काम करा. मात्र एक लक्षात घ्या शिवसैनिक हा कधीच नेत्यांसोबत जात नाही तो शिवसेनेसोबतच रहातो हा इतिहास आहे आणि हे चित्र पाहायला मिळेल असा इशाराही अजित पवार यांनी काही उदाहरणे देत दिला.


सध्या राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आले आहे. १०६ आमदारांचे मुख्यमंत्री होत नाही. मात्र ३९ बंडखोरांचे मुख्यमंत्री होतात यात काळंबेरं आहे हे लक्षात ठेवा असा टोला लगावतानाच शिंदे तुम्ही काम करताना मनुष्य स्वभावानुसार जनता तुम्हाला १०६ मुळे मुख्यमंत्री आहात असे बोलणारच हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.


महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येत होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. मात्र उध्दव ठाकरे यांना आग्रह झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या जीवावर त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. एकंदरीतच ज्यांच्यासोबत गेलात त्या भाजपने १९८० पासून सेनेच्या मदतीने पक्ष वाढवला आहे. भाजप सेनेसोबत राहून ताकद वाढवत गेला आहे. शिंदे तुम्ही आता आपला ग्रुप वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात तर भाजप आपला पक्ष वाढवणार आहे त्यामुळे हे अंतर्गत भांडण सुरूच राहिल हेही अजित पवार यांनी सांगितले. 


तिकडे गेल्यावर ही अनैसर्गिक युती आहे असे बोलत होतात. काहींनी राष्ट्रवादीने अन्याय केला असा पाढा वाचला. मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी एक कोटीवरुन पाच कोटीवर केला. डोंगरी विकासाचा निधी वाढवला. नगरविकास खात्याला सुरुवातीला ३६१ कोटी दिले त्यानंतर २६४५ कोटी दिले. भेदभाव करणारा माणूस नाही. सर्व खात्याला निधी दिला. फडणवीस तुम्हीही मुख्यमंत्री होतात. फायनल हात मुख्यमंत्री फिरवतात याची आठवणही करून देताना राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने ४०१ शिवभोजन थाळी केंद्र शिवसेनेला दिली. हे काम केले तर मी उपकार केले नाहीत. सांगायचं तात्पर्य की राष्ट्रवादीने अन्याय केला असा आरोप केला जात आहे मात्र राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तो योग्य नाही असे सांगतानाच यावेळी अजित पवार यांनी निधी दिला त्याची यादीच सभागृहात वाचली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी