मुंबई : शिवसेनेतून फुटून जो बाहेर पडतो त्याला शिवसैनिक कधीच पुन्हा निवडून येऊ देत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजितपवार यांनी म्हटले पण त्यांचा अविर्भाव असा होता की ते 40 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहेत असा होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. (Ajit Pawar was talking about being a staunch Shiv Sainik for 40 years - Chief Minister Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजितदादा यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाना इशारा देत वरील वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.
अनेकांनी भीती व्यक्त केली की माझ्यासोबत आलेले 50 लोक पुन्हा निवडून येणार नाही. पण मी या सभागृहात सांगतो की या 50 आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यावर हा आकडा 200च्या आसपास घेऊ जाऊ हा शब्द मी सभागृहात देत आहे. नाही झाले तर पुन्हा गावाकडे शेती करायला जाईल अशी प्रतिज्ञा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती. पण सामान्य शि्वसैनिकांना या सत्तेचा काही उपयोग नव्हता. सामान्य शिवसैनिकावर तडीपाऱ्या, खोटे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी इथे आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले सरकार आज राज्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला आहे.
आम्ही वेगळा विचार केला तेव्हा आमच्यावर वाट्टेल ती टीका करण्यात आली. आम्हांला डुक्कर म्हटले, घाण म्हटले, पानटपरीवाला, भाजीवाला, रिक्षावाला म्हटले. पण बाळासाहेबांनी अशा सामन्य लोकांना शिवसैनिक बनवून त्यांना शक्ती देण्याचे काम केले. आता हे सरकार टपरीवाल्यासाठी, भाजीवाल्यासाठी आहे, हे सरकार सर्वांचे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.