Santosh Bangar: मुंबई: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय बांगर (Santosh Bangar) यांनी मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत मॅनेजरला मारहाण केल्याचं समोर आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मात्र प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. 'सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला.. सत्ता एवढ्या लवकर तुमच्या डोक्यात गेली काय?' असा सवाल करत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. (ajit pawar was very angry on shinde group mla santosh bangar)
राज्याचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरु होणार आहेत. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं. यावेळी अजित पवारांनी सरकारवर बरीच टीका केली.
अधिक वाचा: "आधीचे अडीच वर्ष ते आलेच नाहीत अन् आताही तडजोडीने लंगड्या घोड्यावर बसले" सामनातून फडणवीसांवर निशाणा
पाहा अजित पवार नेमकं का संतापले.
'जे महत्त्वाचे विषय आहेत त्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जातात आणि त्याचीच जास्त चर्चा केली जाते. परंतु आता काय मध्येच वंदे मातरम् काढलं. ठीक आहे वंदे मातरमला विरोध असण्याचं कारण नाही. तुम्ही महागाईबाबत बोला. महागाई कमी करण्याबाबत काय निर्णय घेणार आहात त्यावर बोला.' असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अधिक वाचा: 'अस्सलाम वालेकुम' उद्धवजी..., म्हटताच राजनाथ सिंह यांना दिली अशी रिॲक्शन
'मला महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगायचं आहे की, हे सरकार येऊन काही दिवसच झाले. असं असताना यांच्यातील काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा पद्धतीने वागत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा. हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा. कोथळा काढा. अरे काय पद्धत..' असं म्हणत अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं.
'यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा-फोडा मारा.. ही पद्धत? हे एकनाथ शिंदेंना पटतं?, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला पटतं?' असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
'एका तर बहाद्दर शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहेत. तुम्ही स्वत:ला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली काय तुम्हाला?' असं म्हणत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: 'भावना' दुखावल्यामुळे खासदार गवळींचा उद्धव ठाकरेंना धक्का, नगरसेवकांचा होता इरादा पक्का
'शेवटी कोणीही व्यक्ती असली तरी कायदा प्रत्येकाला लागू आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तो सरकारमध्ये असू द्या नाहीतर कोणीही असू द्या. अजून तर सुरुवात झालीए आणि एवढी मस्ती त्यांना आली आहे. यांना थांबवलं कसं जात नाहीए?' असा सवाल विचारून अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांवर देखील टीका केली.
'सत्ताधारी पक्षाचे त्यातही शिंदे गटाचे काही-काही आमदार तर असं.. गुन्हा दाखल झाला तरी मी असाच वागणार.. इतपर्यंतची मस्ती काही आमदारांची झाली आहे. काय सत्ता यांच्या डोक्यात गेली का? सत्ताधारी पक्षाचे आमदार असे वागत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. ती लोकांना दिसली पाहिजे.' अशी मागणीही यावेळी अजित पवारांनी केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.