Corona Virus Third Wave : राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजसह कोचिंग क्लासेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 09, 2022 | 06:47 IST

Corona Virus Third Wave  School Closed: कोरोनाच्या (Corona) वाढत्या  रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा (School) १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने (State Government) शालेय शिक्षण विभागाला (Department of Education) याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत.

All schools and colleges Closed
राज्यातील शाळा आणि महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद, ऑनलाइन वर्ग सुरु राहणार
  • याआधी ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
  • राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल.

Corona Virus Third Wave  School Closed: मुंबई :  कोरोनाच्या (Corona) वाढत्या  रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा (School) १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने (State Government) शालेय शिक्षण विभागाला (Department of Education) याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेसोबतच कॉलेज (college) आणि कोचिंग क्लासेससाठी (Coaching classes) देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी ऑनलाइन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण वाढती रुग्णसंख्या पाहता आता १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. 

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेला आहे, तर एकट्या मुंबईने २० हजारांचा आकडा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल. राज्यातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

याआधी मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमधील शाळा कोरोना रुग्णसंख्येमुळे बंद होत्या. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या ठिकाणी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरसकट सर्व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी