सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवी परीक्षा रद्द

1st to 8th Class Maharashtra state board students promoted to the next class कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

1st to 8th Class Maharashtra state board students promoted to the next class
सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवी परीक्षा रद्द 

थोडं पण कामाचं

  • सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवी परीक्षा रद्द
  • विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय
  • क्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

मुंबईः कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली. 

भारतात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे संकट मागच्या वर्षी (२०२०) धडकले. यामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यामुळे आता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. यामुळे परीक्षा दिली नसूनही विद्यार्थी पुढल्या वर्गात गेले आहेत. (all state board students across Maharashtra state from Class 1st to Class 8th will be promoted to the next class)

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्यांच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश दिला आहे. 

याआधी ऑनलाइन पद्धतीने शालेय शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे ताज्या परिस्थितीचा अंदाज घेऊन परीक्षांबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी