मुंबई महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा घोटाळा : आमदार अमीत साटम

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 25, 2022 | 14:26 IST

Ameet Satam alleges Rs 3 lakh cr scam in BMC in 25 yrs, Demands judicial inquiry : मुंबई महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला. हा आरोप भारतीय जनता पार्टीचे मुंबईतील आमदार अमीत साटम यांनी केला.

Ameet Satam alleges Rs 3 lakh cr scam in BMC in 25 yrs, Demands judicial inquiry
मुंबई महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा घोटाळा : आमदार अमीत साटम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा घोटाळा : आमदार अमीत साटम
  • भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी  अमीत साटम यांनी केली
  • उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी : आमदार अमीत साटम

Ameet Satam alleges Rs 3 lakh cr scam in BMC in 25 yrs, Demands judicial inquiry : मुंबई : मुंबई महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला. हा आरोप भारतीय जनता पार्टीचे मुंबईतील आमदार अमीत साटम यांनी केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी  अमीत साटम यांनी केली. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहेत. या अधिवेशनात विधानसभेत बोलताना आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली.

विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मुंबई महापालिकेच्या कारभारावर चर्चा सुरू होती. यावेळी बोलताना २५ वर्षांपासून भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनेच मुंबई महापालिकेने मोठे निर्णय घेतल्याचे दिसते, असा आरोप आमदार अमीत साटम यांनी केला. महापालिकेत २५ वर्षांत झालेल्या ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी केली. 

मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या प्रत्येत योजनेत कमी जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. चौकशीतून सगळी माहिती पुढे येईल. यामुळे चौकशी व्हायलाच हवी, असे आमदार अमीत साटम म्हणाले.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कंत्राटांच्या माध्यमातून तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार अमीत साटम यांनी केला. एरंगळच्या समुद्रकिनारी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून खासगी स्टुडिओंच्या बांधकामाचे काम सुरू आहे. 

मुंबईत कॅमेरे बसविण्यासाठी ठिकठिकाणी खांब उभारण्यात आले. मोठा खर्च करण्यात आला. आयत्यावेळी कॅमेऱ्यांच्या ऐवजी खांबांवर इंटरनेट कनेक्शनसाठीसाठीची यंत्रणा उभारण्यात आली. कॅमेरा लावण्याचे काम झालेच नाही. इंटरनेटच्या यंत्रणेसाठी निवडक कंपन्यांनाच किरकोळ भाडेपट्टीवर खांब देण्यात आले. या व्यवहारातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार अमीत साटम यांनी केला. सखोल चौकशी झाली तरच भ्रष्टाचाराची पाळमूळं खणून काढता येतील असा विश्वास आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी