'...तेव्हा अमित शहा अर्ध्यातून उठून गेले होते', नितीन गडकरींनी दिली नवी माहिती

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 21:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nitin Gadkari: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहा यांनी कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केला आहे.

amit shah had not given any assurance to uddhav thackeray for the chief minister post said nitin gadkari
'...तेव्हा अमित शहा अर्ध्यातून उठून गेले होते', नितीन गडकरींनी दिली नवी माहिती  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अमित शहांनी कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं: नितीन गडकरी
  • 'शिवसेनेने मागणी केली होती मुख्यमंत्रीपदाची, पण आम्ही आश्वासन दिलं नव्हतं'
  • शिवसेना आणि भाजप आपआपल्या भूमिकांवर ठाम

मुंबई: काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खोटं बोलत असल्याचा दावा केला. याचाच पुनरुच्चार भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केल्यानंतर अमित शहा यांनी तिथेच आपलं बोलणं थांबवलं होतं. असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील तेढ आणखी वाढला आहे. 

माझं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं. लोकसभा झाल्यानंतर जेव्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी  सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पद अशी मागणी केली होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष म्हणाले हे उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की,  निवडणूक झाल्यावर पुढे बोलू आणि ते उठले. त्याचवेळी भाजपचे इतरही नेतेही उठले आणि सर्वजण निघून गेले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चाच झाली नाही.' अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 

'बाळासाहेब असल्यापासून असा फॉर्म्युला होता की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. दरम्यान, आमचे जास्त आमदार निवडून आलेले असले तरी आमची चर्चा करण्याची तयारी होती. पण  पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे पर्याय खुले आहेत. त्यामळे अशा युतीला काहीही अर्थ राहत नाही. पण अजूनही वेळ गेलेला नाही. हिंदुत्व आमच्यातील दुवा आहे. त्यामुळे या विचारधारेवर पुन्हा आम्ही एकत्र येऊ शकतो. पण मला असं वाटतं आहे की,  शिवसेना चुकत आहे. सध्या मी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या संपर्कात आहे.' असंही गडकरी यावेळी म्हणाले.

 

 

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी? 

'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल. तसंही ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला बाळासाहेब असल्यापासून आहे. त्यामुळे आता देखील भाजपाचाच आमदार होईल. जर गरज पडली तर मी शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्कीच मध्यस्थी करेन.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...