Amit Shah : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा, लालबागच्या राजाचे घेणार दर्शन

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍याच्या वेळी अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शनही घेणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौर्‍याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौर्‍यात शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर चर्चा करणात आहेत.

amit shah mumbai visit
अमित शहांचा मुंबई दौरा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबई दौर्‍यावर येणार आहेत.
  • या दौर्‍याच्या वेळी अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शनही घेणार आहेत.
  • मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौर्‍याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Amit Shah : मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍याच्या वेळी अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शनही घेणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौर्‍याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौर्‍यात शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर चर्चा करणात आहेत. (amit shaha bjp leader and union minister visit mumbai visit Lalbaugcha Raja and meet devendra fadanavis and ekanth shinde over bmc election)

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत नवी माहिती उघड

अमित शहा हे लालबागच्या राजाचे भक्त आहेत. शहा दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसोबत गणपतीचे दर्शन घेतात अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली आहे. तसेच यंदाही अमित शहा मुंबई दौर्‍यावर येणार असून लालबागच्या राजाचे दर्शन घेतील असेही भाजप नेत्यांनी सांगितले.

लालबागच्या राजाच्या दर्शनाशिवाय अमित शहा मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतील. शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. शहा आणि शिंदे यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणूकीवर चर्चा होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शहा यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे. 

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

गेली ३० वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेचेनी सत्ता आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यावर ताबा मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. २०१७ साली राज्यात भाजप शिवसेना युती असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हा शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. मनसेला अवघ्या ७ जागांवर यश मिळाले होते, त्यानंतर ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत सामील झाले होते. शिवसेनेला मुंबई महानगरपालिका राखण्यात यश आले होते. 

Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर

यंदा मुंबई महानगरपालिकेसाथी २३६ जागांवर निवडणूक खोणार आहे. त्यापैकी १३४ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने मुंबईचे वॉर्ड २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेचे २२७ वॉर्ड ठेवण्यात आले होते. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी आपल्या पद्धतीने मतदारसंघांची पुर्नरचना केली होती असा आरोप भाजपने केला होता. 

Shivsena : शिवसेनेचे दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार, 'या', मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ

मुंबई महानगरपालिका निवडणूकीपूर्वी शिंदे गटाची आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटातील नगरसेवक फोडण्याची आणि शिवसेना कमकुवत करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे गटाकडे देण्यात आली आहे.  मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी