Navneet Rana and Ravi rana : राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,  पुढील पाच दिवस तुरुंगात मुक्काम

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. परंतु कोर्टाने पोलिसांची ही मागणी फेटाळली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

navneet rana and ravi rana
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरावतीच्या खासदार नवणीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
  • पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.
  • परंतु कोर्टाने पोलिसांची ही मागणी फेटाळली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Navaneet Rana and Ravi Rana : मुंबई : अमरावतीच्या खासदार नवणीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. परंतु कोर्टाने पोलिसांची ही मागणी फेटाळली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना २७ एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे, तोपर्यंत नवणीत राण आणि रवी राणा दोघांचा मुक्काम तुरुंगात असणार आहे.  

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही गुन्हा दाखल केला आहे. तसेच नवणीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी खासदा नवणीत राणा आणि रवी राणा यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.  

रिझवान मर्चंट म्हणाले की, नवणीत राणा आणि रवी राणा हे दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना अटक करण्यापूर्वी सदनाच्या अध्यक्षांची परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु या प्रकरणात कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे मर्चंट म्हणाले. तसेच कोर्टानेही नवणीत राणा आणि रवी राणा यांना जामीन दिलेला नाही. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, हनुमान चालीसावरून दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला गेल आहे. त्यानंतरच राणा पती पत्नीला अटक करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

नवनीत राणा, रवी राणा हे मुंबईत दाखल झाल्यापासून मुंबईतील वातावरण तापलं होतं. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असलेल्या दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी खार पोलीस स्टेशन गाठलं. परंतु बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.  फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुडंगिरी चालली आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी