An iron rod fell from a building on a moving rickshaw in Mumbai, killing a mother and seriously injuring her daughter : मुंबईत जोगेश्वरी पूर्व येथे एक धक्कादायक घटना घडली. चालत्या रिक्षावर इमारतीवरून लोखंडी रॉड कोसळला. या दुर्घटनेत रिक्षातून प्रवास करत असलेल्या आई आणि मुली पैकी आईचा मृत्यू झाला. मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाली. सध्या जखमी असलेल्या मुलीवर ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जोगेश्वरी पूर्व येथे वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे जवळ सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या साईटवर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच इमारतीतून लोखंडी रॉड खाली रस्त्यावर पडला. रस्त्यावरून जात असलेल्या चालत्या रिक्षावर रॉड पडला. वरून पडलेल्या रॉडमुळे रिक्षात बसलेल्या दोघांपैकी आईचा मृत्यू झाला आणि मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याआधी फेब्रुवारी महिन्यात (फेब्रुवारी 2023) मुंबईत वरळीच्या गांधीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. फोर सीझन रेसिडन्सी (Four Season Residency) नावाच्या हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. हॉटेलच्या इमारतीच्या 42व्या मजल्यावरून सीमेंटचा ब्लॉक अर्थात सीमेंटचा दगड खाली पडला. हा सीमेंटचा दगड रस्त्यावरून जात असलेल्या 2 जणांच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
इमारतीचे बांधकाम सुरू असूनही आसपासच्या भागात सुरक्षेचे उपाय करण्यात आले नव्हते. यामुळे इमारतीतून पडलेला सीमेंटचा ब्लॉक थेट नागरिकांच्या डोक्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे सीमेंटचा ब्लॉक डोक्यावर पडून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती इमारतीत कोणाकडेच नव्हती. जखमी झालेले 2 जण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून होते. या कालावधीत दोघांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जेव्हा दुर्घटना झाल्याचे कळले तेव्हा 108 वर कॉल करून अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि जखमींना नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळली होती. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
Rangpanchami : रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?
Yashwantrao Chavhan Speech : यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.